निवडणुकीत येवलेवाडीत लाखांची रोकड जप्त!

15 Jan 2026 15:15:48
पुणे,
PMC Election 2026 : पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि. १३) रात्री येवलेवाडी परिसरात वेगवेगळी पथके तयार करून शोध घेत असताना खडीमशिन चौकात दोन चारचाकी वाहनांमध्ये भरारी पथकाला एक लाखाची रोकड (पाचशे रुपयांचे दोन बंडल), लिफाफे आणि वह्या असा मुद्देमाल सापडला.
 
 
PUNE
 
अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, साहाय्यक पोलिस आयुक्त नम्रता देसाई, साहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली. यामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी पोलिसांच्या सक्रियतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
Powered By Sangraha 9.0