पोहरादेवी तीर्थक्षेत्राकडे जाणार्‍या सिमेंट रस्त्याचे काम रामभरोसे

15 Jan 2026 19:40:09
पाण्याचा अभाव, निकृष्ट दर्जाबाबत भाविकांमध्ये संताप
 
मानोरा, 
नवा महाराष्ट्र आणि राज्य शासनाच्या वतीने Pohradevi pilgrimage route श्रीक्षेत्र पोहरादेवी या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. वाशीम सह मराठवाडा यासारख्या मोठ्या शहरातून येणार्‍या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी धानोरा ते वाई गौळ या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र, या रस्त्याच्या कामात कंत्राटदाराकडून प्रचंड निष्काळजीपणा होत असून, सिमेंटच्या रस्त्याला आवश्यक असलेले पाणीच मारले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
 
pahara devi
 
सिमेंट रस्ता असूनही पाणी का नाही?सिमेंट काँक्रीटचा रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी त्याचे ’युरिंग’ (पाणी मारणे) होणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, धानोरा ते वाई गौळ या मार्गावर काम सुरू असताना कंत्राटदाराकडून रस्त्यावर पाणी मारण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. दिवसा उन्हाचा तडाखा आणि पाण्याचा अभाव यामुळे नवीन बनवलेल्या रस्त्याला तडे जाण्याची आणि रस्ता लवकरच उखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाचा मोठा निधी खर्च होऊनही जर कामाचा दर्जा राखला जात नसेल, तर याला जबाबदार कोण? असा सवाल भाविक विचारत आहेत.
 
 
Pohradevi pilgrimage route  पोहरादेवी हे बंजारा समाजाचे काशी मानले जाते. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा हा शासनाचा प्रामाणिक हेतू असला, तरी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मात्र दर्जाचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे राज्य शासन तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची कमतरता भासू देत नाही, मात्र दुसरीकडे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार आता जोर धरू लागली आहे.

संबधित विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तातडीने कामाची पाहणी करावी आणि संबंधित कंत्राटदाराला रस्त्यावर नियमित पाणी मारण्याचे व कामाचा दर्जा सुधारण्याचे कडक निर्देश द्यावेत. अन्यथा, निकृष्ट कामामुळे भविष्यात होणार्‍या अपघातांना आणि सरकारी निधीच्या अपव्ययाला प्रशासन जबाबदार असेल.
 
महंत संजय महाराज
Powered By Sangraha 9.0