मतदानानंतर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

15 Jan 2026 10:31:37
अकोला,
Prakash Ambedkar's big statement अकोला महापालिकेच्या ८० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि पत्नी अंजली आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका बारकाईने पाहत आहे. ही निवडणूक भाजपची गेल्या दहा वर्षांची दादागिरी मोडणारी ठरणार आहे.
 

prakash ambedkar matdan 
 
ते म्हणाले की, भाजपला ‘वन पार्टी सिस्टीम’ हवी आहे, मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक भाजपविरोधात होत असून जनतेला मल्टी पार्टी सिस्टीम हवी आहे. तसेच, कोणत्याही महापालिकेत एकहाती सत्ता येणार नाही आणि हेच चित्र मुंबई महापालिकेतही पाहायला मिळेल, असा त्यांनी दावा केला. दरम्यान, निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी पैसा वाटपाच्या घटना घडत असल्या तरी दुसरीकडे मतदार अशा लोकांना हाकलून लावत असल्याचे दिसून येत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी असेही नमूद केले की, ही बाब लोकशाहीसाठी सकारात्मक आहे.
Powered By Sangraha 9.0