PSLV-C62 मिशन अपयशी; पाक-बांगलादेश-चीनबाबत धक्कादायक माहिती समोर

15 Jan 2026 13:19:33
नवी दिल्ली,  
pslv-c62-mission भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) १२ जानेवारी रोजी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या अगदी उंबरठ्यावर होती, मात्र अखेरच्या क्षणी हे मिशन अपयशी ठरले. पीएसएलव्ही-सी६२ या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे ही कामगिरी साध्य होणार होती; परंतु प्रक्षेपणानंतर रॉकेट आपल्या निश्चित मार्गावरून भरकटल्याने मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून विविध तर्क-वितर्कांनाही उधाण आले आहे.
 
pslv-c62-mission
 
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आलेले हे २०२६ मधील इस्रोचे पहिले कक्षीय प्रक्षेपण होते. या मोहिमेत EOS-N1 हा उपग्रह अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ‘अन्वेषा’ असे नामकरण करण्यात आलेला हा हायपरस्पेक्ट्रल पृथ्वी निरीक्षण उपग्रह संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केला होता. पृथ्वीची अत्यंत स्पष्ट छायाचित्रे घेऊन लष्करी नकाशे तयार करणे, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि संरक्षण सज्जतेसाठी आवश्यक माहिती मिळवणे हा या उपग्रहाचा मुख्य उद्देश होता. pslv-c62-mission मात्र, या महत्त्वाच्या मोहिमेचे यश केवळ थोडक्यात हुकले. इस्रोने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रॉकेट अपेक्षित कक्षेत पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे मिशन अयशस्वी ठरले. या अपयशामागे नेमकी कोणती तांत्रिक कारणे होती, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रक्षेपणाच्या वेळी चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश सीमावर्ती भागात विशिष्ट प्रकारचे सायरन वाजल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी यासंदर्भात कोणत्याही अधिकृत संस्थेकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. इस्रोनेही या बाबींवर कोणतेही भाष्य केलेले नाही आणि शेजारी देशांचा या घटनेशी काहीही संबंध असल्याचे संकेत अधिकृतरीत्या नाकारले आहेत.
या मोहिमेशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, स्पेनमधील एका खासगी कंपनीच्या लहान अंतराळयानाने पुनर्प्रवेशाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. pslv-c62-mission जमिनीवरून मिळालेल्या संकेतांच्या आधारे त्याची ओळखही निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे, रॉकेट निष्क्रिय झाल्यानंतरही संबंधित प्रणालीने सुमारे १९० सेकंदांपर्यंत उड्डाणाशी संबंधित डेटा प्रसारित करणे सुरू ठेवले होते. सामान्यतः अशा परिस्थितीत कोणताही डेटा मिळत नाही, मात्र या प्रकरणात डेटा मिळाल्याने तांत्रिक विश्लेषणासाठी इस्रोला महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे. या अपयशातून धडे घेत पुढील मोहिमा अधिक सक्षमपणे राबवण्यात येतील, असा विश्वास इस्रोकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0