नागपूर,
Raid on a brothel : प्रतापनगर हद्दीत एका फफ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने धाड घालून एका आराेपीला अटक करीत पीडित तरुणीची सुटका केली.
खामला मार्गावरील मालवियनगर येथील स्नेह संवर्धक काे. ऑप. हाऊसिंग साेसायटी येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पाेलिस पथकाला मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी आपल्या पंटरला या कुंटणखान्यावर पाठविले. पंटरने दिलेल्या माहितीवरून पाेलिसांची खात्री पटली. त्यानंतर पाेलिसांनी पुन्हा त्याच पंटरला तीन हजार रुपये देऊन या कुंटणखान्यावर पाठविले आणि सापळा रचला. पंटरने अमाेल अशाेक पाचपाेर याच्याशी संपर्क करून त्याला तीन हजार रुपये दिले. त्यानंतर अमाेलने त्याला एका खाेलीत पाठविले. तेथे एक तरुणी हाेती. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पाेलिसांनी या कुंटणखान्यावर धाड घातली. या धाडीत पाेलिसांनी अमाेलकडून तीन हजार रुपये, माेबाईल आणि इतर साहित्य असा 43 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रतापनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवून अमाेलला अटक केली. पाे. नि. राहुल शिरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.