निष्ठावंतांना विश्‍वासात घेण्याची गरज : रमेश भुरसे

15 Jan 2026 20:12:06
गडचिरोली, 
भारतीय जनता पार्टीने गडचिरोली नगर परिषदेचा गटनेता निवडताना कुणालाच विश्‍वासात घेतले नाही. आपण गेल्या 42 वर्षापासून भाजपमध्ये एकनिष्ठपणे काम करीत आहे. मात्र निष्ठावंतांना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप किसान आघाडीचे प्रदेश सचिव Ramesh Bhurse रमेश भुरसे यांनी केला आहे. आपल्याला पक्षश्रेष्ठींनी नगर परिषदेच्या स्विकृत सदस्य पदापासून दूर ठेवल्याचा आरोपही त्यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून केला आहे.
 
 
Ramesh
 
Ramesh Bhurse :  या निवडणुकीत मिळालेले यश हे तेली समाजामुळे आहे व तेली समाज पूर्णपणे भाजपसोबत आहे. याचे श्रेय आपल्याला, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, प्रमोद पिपरे या निष्ठावंत लोकांना जाते. मात्र पक्षात याच लोकांना आज डावलले जात आहे, असाही आरोप भुरसे यांनी केला आहे. यावेळी पत्रपरिषदेला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते गजानन येनगंदलवार यांनीसुद्धा स्विकृत सदस्य बणण्याची आपली इच्छा होती. मात्र पक्षाने आपल्या नावाचा विचार केला नाही, असे सांगत नाराजी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0