आपले मत केंद्रावर येऊन मांडणे गरजेचे- सचिन तेंडुलकर

15 Jan 2026 10:21:10
मुंबई,
Sachin Tendulkar cast his vote. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरु झाली असून राज्यभर राजकीय वातावरण तणावपूर्ण आहे. प्रलंबित असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नागरिक उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला.
 
 

sachin tendulka 
सचिन तेंडुलकर सकाळी वांद्रे येथील मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्या सोबत पत्नी अंजली तेंडुलकर देखील उपस्थित होत्या. मतदानानंतर सचिन तेंडुलकर यांनी नागरिकांना लोकशाहीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले, “क्रिकेटमध्ये जशी प्रत्येक धाव महत्त्वाची असते, तशीच लोकशाहीत प्रत्येक थेंबासारखा तुमचा प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. शहराचा निकाल हवा असेल तर घरात बसून चालणार नाही, केंद्रावर येऊन बटण दाबावे लागेल.
 
सचिन तेंडुलकर यांनी पुढे सांगितले की, मी मतदान करायला आलोय कारण प्रत्येक मताचा फरक पडतो. त्यामुळे सर्वांना विनंती करतो की या आणि मतदान करा. प्रत्येक मत मॅटर करतं. तुमचा विचार येथे येऊन मांडा, हीच वेळ आहे. मतदानाचा नीट वापर करा. प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक मत महत्वाचं आहे. तुम्हाला हवा तो निकाल मिळवण्यासाठी मतदान करणे गरजेचं आहे.
Powered By Sangraha 9.0