Saundad: Sarpanch Kite Festival तालुक्यातील सौंदड येथे लोकनियुक्त सरपंच हर्ष मोदी यांच्या पुढाकारातून मकर संक्रातीच्या पर्वावर जनसेवा बहुउद्देशीय संस्था व ग्रामपंचायत सौंदडच्या संयुक्त विद्यमाने सरपंच पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यंदा महोत्सवाचे चौथे वर्ष होते. प्रसंगी सहाशेहून अधिक बालकांना पतंग वाटप करण्यात आल्या.
Saundad: Sarpanch Kite Festival गावातील हिराबाजी मैदानात पार पडलेल्या पंतग महोत्सवात अबालवृद्धांनी सहभाग घेत पंगबाजीचा आनंद घेतला. उपक्रमामुळे गावात आनंद, उत्साह आणि सामाजिक एकोपा पहावयास मिळाला. पंतग महोत्सव सौंदडच्या सामाजिक जीवनाचा भाग झाला आहे. महोत्सवात 600 हून अधिक बालकांना पतंग, सूती धाग्याच्या रिल, चॉकलेट, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी सरपंच हर्ष मोदी यांनी पर्यावरणपूरक पतंग महोत्सवाचे महत्त्व सांगीले. नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी तसेच मानवी जीवनाला धोका निर्माण होतो, त्यामुळे पंगबाजीसाठी सूती धाग्याचाच वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. सुरक्षित व जबाबदार पद्धतीने सण साजरे करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला पंस सदस्य वर्षा शहारे, माजी उपसरपंच कुंदा साखरे, रंजना भोई, प्रमिला निर्वाण, अर्चना चन्ने, सुषमा राऊत, स्नेहा मोदी, खुशाल ब्राह्मणकर, ओंकार टेंभुर्णे, मदन साखरे, मोरेश्वर चांदेवार, मंगेश निंबेकर, ग्यानीराम किरनापुरे, याकुब पठाण, शालिकराम निर्वाण, रवी डोंगरवार, पुरुषोत्तम निंबेकर, हिमांशु राऊत, नवज्योतज तुमाने, हितेश मेश्राम, लोकेश निर्वाण आदींसह गाव व परिसरातील नागरिका उपस्थित होते.