शिव महापुराण कथास्थळी पार्थिव शिवलिंगाचे पूजन
सोमेश्वर महादेव महिला मंडळाने केले पूजन
आर्णी,
बहिरम Shiva Mahapuran शिवपुराण सेवा समितीद्वारा ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत जगवि‘यात कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथाचे आर्णी येथे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने तयारिला सुरवात झाली आहे. आर्णी माहुर मार्गावरील प्रिया नर्सरी समोर ही कथा होणार आहे. या कथास्थळी सोमेश्वर महादेव महिला मंडळद्वारे पार्थिव शिवलिंग त्याची विधिवत पुजन करण्यात आले. तसेच शिवमहापुराण कथा निर्विघ्नपणे पार पडु द्या, अशी प्रार्थना करण्यात आली.

सोमेश्वर महादेव महिला मंडळाच्या सदस्यांनी सोमवारी शावमहापुराण कथा स्थळी येवून त्यांनी शेतातिल मातिचे पुजन केले. त्या मातिचे पार्थिव शिवलिंग निर्माण करुन त्याचे विधिवत पुजन केले. यावेळी सोमेश्वर महादेव महिला मंडळाच्या पायल शिंदे, उज्वला सविता उपलेंचवार, छाया उपलेंचवार, मनीषा बेदरकर, प्रमिला जरांडे, अर्चना उपलेंचवार, ललिता जैस्वाल, कमला अस्वार, सुनीता बंगलावार, सुनीता मुन्नरवार, सुनीता शिंदे, विद्या मोकळे, व्ही. गावंडे, रेखा माहेश्वरी, अनिता मानहोले, अनिता गुप्ता, विमल गुप्ता, कल्पना जाधव, जयश्री खंडार, विद्या गावंडे, रेखा चांडक यांची उपस्थिती होती. यावेळी बहिरम Shiva Mahapuran शिवमहापुराण सेवा समितीचे ब‘म्हा प्रा. सुनिल चोरडिया, सचिन दीप्पेवार, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निलेश गावंडे, अशोक गावंडे, संजय उपलेंचवार, संजय शिंदे, नंदू शिवरामवार, विजय मोकळे, नंदू लाड, ओम प्रजापती, अमोल झंझाड, विलास गुंडेवार, राजेश माहेश्वरीसह शिवभक्त उपस्थित होते.