डोंगरगाव शिवारात कारवाई
समुद्रपूर,
Tiger in the Khursapar forest तालुयातील गिरड खुर्सापार परिसरात गेल्या वर्षभर्यापासुन मुकामी असलेल्या ५ वाघांच्या कुटुंबाने दहशत निर्माण केली. या वाघांनी अनेक जनावरांचा फडशा पाडला. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. आ. समिर कुणावार यांच्या पाठपुरावाने पाचही वाघांना पकडण्याचे आदेश मिळाले होते. त्यामुळे एका वाघाला पिंजर्यात अडविण्यात वनविभागाच्या कर्मचार्यांना शेवटी यश मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवार १५ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाघाने डोंगरगाव शिवारातील राजू भुजाडे यांच्या गोर्यावर हल्ला चढवून ठार केले. त्याची माहिती मिळताच नवेगाव नागझिरा येथील रॅपिड रेस्यू टिम, पिपल फॉर अॅनिमल्सची वर्धा टिम व सह वनविभागाचे अधिकारी कर्मचार्यांनी याठिकाणी सापळा रचून सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास वाघ पुन्हा याठिकाणी आला यावेळी वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करून पिंजर्यात टाकले. गेल्या ११ दिवसातून या वाघाच्या मागावर वनविभागाची संपूर्ण टिम लागून होती.
Tiger in the Khursapar forest आ. कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक तसेच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे वाघांना जेरबंद करण्याची मागणी केली होती. उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, सहाय्यक वनसंरक्षक हरीलाल सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात या वाघांच्या कुटुंबियांच्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाची टिम युद्ध पातळीवर काम करीत असून जंगल परिसरात शेकडो स्ट्रॅप कॅमेर्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. २ ड्रोन कॅमेरे सुध्दा रोज जंगल परिसरात घिरट्या घालत आहे. ६० च्यावर अधिकारी व कर्मचारी वाघांच्या मागावर असून या ५ वाघांना जेरबंद करण्यासाठी रननीती आखली आहे. त्यामुळे वनविभागाच्या टिमचा गिरड खुर्सापार परीसरात दहशत निर्माण करणार्या या पाचही वाघांना जेरबंद करण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी देखील वाघ मात्र हातात यायचे नाव घेत नव्हते. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी हैराण झाले आहेत. आ. कुणावार स्वत: रोज वनविभागाच्या अधिकार्यांकडून आढावा घेत होते. यातील एका वाघाला पकडताच वनविभागाच्या टिमचे सुटकेचा निश्वास घेतला आहे. आ. कुणावार यांनी समुद्रपुर येथे वाघाला डार्ट मारणार्या शुटर सह वनविभागाच्या टिमचे कौतुक केले आहे. आता उरलेल्या ४ वाघांना सुद्धा जेरबंद करण्याचा विश्वास वनविभागाच्या चमुचे व्यत केला आहे. या वाघाला पेंच व्याघ्रप्रकल्पा नेण्यात आले आहे.