मनपा निवडणूकीत चौथ्यांदा रेकॉर्ड ब्रेक विजय

15 Jan 2026 19:04:22
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

नागपूर,
नागपूरच्या जनतेने महानगरपालिका निवडणूकीत तिसर्‍यांदा निवडून दिल्यानंतर विकासाचे अनेक कामे करण्याची संधी मिळाली. आता पुन्हा चौथ्यांदा मनपा निवडणूकीत रेकॉर्ड ब्रेक विजय होईल, असा विश्वास Union Minister Nitin Gadkari केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला. शहरातील चहुबाजूने होत असलेल्या विविध विकास कामांची मतदारांना संपूर्ण माहिती आहे. गेल्या १५वर्षात विकासाची अनेक कामे झाल्याने नागपूरचा चेहरामोहरा पूर्णत: बदलेला आहे. आतापर्यंत झालेल्या विकास कामांचे ट्रेलर होते. यानंतर पुढे नागपूर शहरात अनेक चांगले प्रकल्प दिसणार आहे.
 

gadakari 
 
महानगरपालिका निवडणूकीसाठी गुरुवारी सकाळी चिटणीस पार्क, महाल येथील इंग्लिश हायस्कूल येथे नितीन गडकरी यांनी परिवारासोबत मतदान केले. मतदानानंतर ते पत्रकारांशाी बोलत होते.
 
 
मतदार यादीतील घोळाचा फटका
मतदार याद्यातील घोळावर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. माझ्या कुटुंबातील चार ते पाच मते एका प्रभागात तर एक मत दुसर्‍याच प्रभागात टाकण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. अनेक उमेदवार व माजी नगरसेवकांनाही मतदार यादीतील घोळाचा फटका बसला आहे. शहरात सर्वच प्रभागात मतदार याद्यामध्ये घोळ ठळकपणे पुढे आला असल्याने निवडणूक आयोगाने यात सुधारणा करावी. मनपा निवडणूकीच्या मतदार याद्या यापुढे व्यवस्थित केल्या गेल्यास कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी सूचना Union Minister Nitin Gadkari  नितीन गडकरी यांनी केली. मतदानाचा अधिकार आहे, प्रत्येकाने तो बाजवावा, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
उमेदवारावर हल्ला दुर्दैवी
गोरेवाडा, प्रभाग ११ मधील भाजपचे उमेदवार व माजी नगरसेवक भूषण शिंगणे यांच्यावर बुधवारी रात्री काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. यात त्यांच्या हाताला, तोंडाला गंभीर जखम झाली असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर ते घरी गुरुवारी नितीन गडकरी यांनी शिंगणे यांची भेट घेतली. शिंगणे यांनी झालेला संपूर्ण प्रकार गडकरी यांना सांगितला. भूषण शिंगणे यांच्यावरील हल्ला हा दुर्दैवी आहे. मतभेद असावे पण मनभेद नको, या घटनेचा निषेध करतो, असे Union Minister Nitin Gadkari  गडकरी म्हणाले.
Powered By Sangraha 9.0