गोविंदराव वंजारी महाविद्यालयात एनएसएस शिबिर

15 Jan 2026 15:15:14
नागपूर,
Vanjari Collegeगोविंदराव वंजारी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे चिकणा गटग्रामपंचायत येथे वार्षिक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात स्वच्छता अभियान, आरोग्य जनजागृती, बेटी बचाओ-बेटी पढाओ, मतदान जनजागृती, नशामुक्त भारत रॅली, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिबिराच्या समारोप प्रसंगी सरपंच कल्याणी वानखेडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांद्वारे गरजू घटकांच्या समस्या कशा कमी करता येतील, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी चिकणा गटग्रामपंचायतचे माजी सदस्य आत्मारामजी कांबळे यांनी युवकांना प्रेरणादायी भाषण केले. तसेच प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्ये व राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून दिले.
 
manoj
 
 
 
या शिबिरात महाविद्यालयाचे उपप्राचार्य व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. राकेश श्रीवास्तव, प्रशिक्षण व प्लेसमेंट डीन डॉ. अनिल तिजारे, कुलसचिव प्रा. अविष्कार वंजारी, पॉलिटेक्निकचे प्रभारी प्रा. राज कुहिते, सर्व विभागप्रमुख, एनएसएस प्रभारी प्रा. मनोज वैराळकर व त्यांची टीम, तसेच सरपंच कल्याणी वानखेडे, उपसरपंच कृष्णाजी हजारे, सचिव सुशीला भानुसे, सदस्य प्रमिला आकरे, माजी सदस्य आत्माराम कांबळे व स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Vanjari College समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन विद्यार्थी आयुषी शिंदे यांनी केले. हे वार्षिक विशेष शिबिर अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, अमर सेवा मंडळाचे सचिव व विधान परिषदेचे आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी, अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा तसेच आर.टी.एम.एन.यू.च्या सिनेट सदस्या डॉ. स्मितावंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले.
सौजन्य:मनोज वैराळकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0