गडचिरोली,
नगर परिषदेच्या आज, 15 जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत Vice-President: Nikhil Charde उपाध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक निखिल चरडे यांची निवड करण्यात आली आहे. तर स्विकृत सदस्य म्हणून भाजपचे सागर निंबोरकर, सुधाकर येनगंदलवार या दोघांची निवड झाली आहे. भाजपकडून सागर निंबोरकर व सुधाकर येनगंदलवार असे दोन नामांकन दाखल झाले होते. त्या दोघांचीही निवड करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी दिली.

Vice-President: Nikhil Charde काँग्रेसकडून मात्र स्विकृत सदस्याच्या एका जागेसाठी दोन नामांकन दाखल झाले होते. नंदू कायरकर आणि नदीम नाथानी या दोघांनाही गटनेत्याने शिफारसपत्र दिले गेले होते. त्यामुळे सदस्य निवडीसाठी पेच निर्माण झाला होता. मात्र अखेरच्या क्षणी काँग्रेसच्या गटनेत्याने नंदू कायरकर यांच्या नावाला समर्थन दिल्याने नदीम नाथानी यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसच्या एका गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र भाजपचे सागर निंबोरकर यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे नगरसेवकांमध्ये व पक्षातील नेत्यांमध्ये, पदाधिकार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. या निवडीनंतर नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी उपाध्यक्ष निखील चरडे, स्वीकृत सदस्य सागर निंबोरकर, सुधाकर येनगंदलवार, नंदू कायरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, महामंत्री प्रशांत वाघरे, गोविंद सारडा आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.