आरमोरी नप उपाध्यक्षपदी विलास पारधी बिनविरोध

15 Jan 2026 20:16:29
आरमोरी, 
Vilas Pardhi Vice President of Armori Municipal Council. आरमोरी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी विलास पारधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष रुपेश पुणेकर यांच्या अध्यक्षतेखाली 13 जानेवारीला पार पडलेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने विलास पारधी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
 
 
pardhi
 
आरमोरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष व 20 नगरसेवक अशी एकूण 21 सदस्य संख्या असून नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व 15 नगरसेवक भाजपाच्या पोरेड्डीवार गटाचे निवडून आल्याने नगरपरिषदेवर दुसर्‍यांदा भाजपची सत्ता स्थापन झाली. मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. तसेच या निवडणूक प्रक्रियेत पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रुपेश पुणेकर यांनी, तर सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी प्रितेश मगरे यांनी काम पाहिले. शांततापूर्ण वातावरणात सभा पार पडली.
 
 
Vilas Pardhi Vice President of Armori Municipal Council. दरम्यान, आरमोरी नगरपरिषदेत भाजपची सत्ता आल्याने स्वीकृत दोन सदस्य पदांवर भाजपच्यावतीने नियुक्त्या करण्यात आल्या. भाजपचे आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे व युवा कार्यकर्ते अक्षय धकाते यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. सर्वसाधारण सभेला नगरसेवक क्रूणालिनी नितीन निमगडे, राहुल तितीरमारे, प्रिया अनिल साखरकर, भारत बावनथळे, ओमिता माणिक मडावी, शुभम निंबेकार, प्रकाश पंधरे, मिनाक्षी योगेश देविकार, सरीता चंदू रामटेके (वाघरे), अक्षय दिपक बागडे, मेघा गोपीचंद मने, सुनिता प्रकाश भोयर, सुरज भोयर, लता अनिल डोकरे, माणिक भोयर, छाया पवन नारनवरे, निखील सुधाकर बोंदरे, अक्षय चंद्रशेखर हेमके, मिनाक्षी सिताराम गेडाम आदी नगरसेवक उपस्थित होते.
 
 
निवडीनंतर भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक व स्वीकृत सदस्यांनी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश सावकार पोरेड्डीवार व माजी आमदार कृष्णा गजबे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आरमोरी नगरपरिषदेतील नव्या नेतृत्वामुळे शहर विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0