विराटने केली श्रेयसची मिमिक्री; रोहितची प्रतिक्रिया व्हायरल, VIDEO

15 Jan 2026 16:36:04
नवी दिल्ली, 
virat-mimicked-shreyas भारत–न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या कमालीच्या रंगतदार टप्प्यावर आली आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला, मात्र दुसऱ्या सामन्यात किवींनी जोरदार पुनरागमन करत भारताला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे आता १८ जानेवारी रोजी इंदूर येथे होणारा तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघातील खेळाडूंचा एक मजेशीर क्षण सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
 
virat-mimicked-shreyas
 
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली, सहकारी श्रेयस अय्यरच्या चालण्याची गंमतीशीर नक्कल करताना दिसतो. कोहलीचा हा अंदाज पाहून मागे उभा असलेला कर्णधार रोहित शर्मा स्वतःला हसू आवरू शकत नाही आणि खळखळून हसतो. हा क्षण पाहून उपस्थित चाहतेही जोरदार दाद देताना दिसतात. हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया अक्षरशः ओसंडून वाहत आहेत. virat-mimicked-shreyas काही चाहत्यांनी “हा तर सरपंच साहेबांचा खास स्वॅग आहे” अशी टिप्पणी केली आहे, तर काहींनी “विराट कधीच बदलणार नाही, त्याने मिमिक्रीचे क्लास सुरू करावेत” असे गंमतीशीर मत मांडले आहे. एका चाहत्याने तर “कोहलीने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो खऱ्या अर्थाने ऑलराउंडर आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांना हा व्हिडिओ अत्यंत क्युट आणि मजेदार वाटत असल्याचेही कमेंट्समधून दिसून येते.

सौजन्य : सोशल मीडिया
क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली हा आक्रमक आणि जोशपूर्ण खेळासाठी ओळखला जातो. मात्र मैदानाबाहेर किंवा ड्रेसिंग रूममध्ये तो नेहमीच मस्तीखोर आणि कूल स्वभावाचा दिसतो. virat-mimicked-shreyas सहकाऱ्यांची फिरकी घेणे, थट्टा–मस्करी करणे आणि वातावरण हलकं-फुलकं ठेवणे ही त्याची खासियत आहे. सामना सुरू होण्याआधी किंवा संपल्यानंतर असे अनेक क्षण कॅमेऱ्यात कैद होतात आणि ते लगेचच व्हायरल होतात. अशा मजेशीर क्षणांमुळे संघातील खेळाडूंमध्ये सकारात्मक ऊर्जा, मजबूत टीम स्पिरिट आणि आपुलकीचं नातं निर्माण होतं. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओही चाहत्यांसाठी निव्वळ मनोरंजन ठरत असून, सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
Powered By Sangraha 9.0