मतदानात गैरप्रकार नको; शाई पुसण्यावर निवडणूक आयोगाचा कडक इशारा

15 Jan 2026 13:37:14
मुंबई,  
commission-warning-on-removing-ink राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकांमध्ये एकूण २ हजार ८६९ जागांसाठी लढत होत असून, ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांसाठी राज्यभरात ३९ हजार ९२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, निवडणूक रिंगणात एकूण १५ हजार ९०८ उमेदवार आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी निश्चित करण्यात आली आहे.


commission-warning-on-removing-ink
 
दरम्यान, मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे हे गंभीर गैरकृत्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. एखाद्या व्यक्तीने शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयोगाने दिला आहे. commission-warning-on-removing-ink केवळ शाई पुसल्याने पुन्हा मतदान करता येईल, हा गैरसमज असून प्रत्यक्षात मतदान झाल्यानंतर संबंधित मतदाराची नोंद अधिकृतरीत्या घेतली जाते. त्यामुळे शाई पुसली तरी कोणालाही दुसऱ्यांदा मतदान करता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. या संदर्भात आवश्यक ती खबरदारी आधीच घेण्यात आली असून सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश जारी केले होते. त्या आदेशांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावली जाते.
या प्रक्रियेत नखावर तसेच नखाच्या वरच्या बाजूच्या त्वचेवर तीन ते चार वेळा शाई घासून लावण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना संबंधित मार्कर पेनवरही नमूद करण्यात आलेल्या आहेत. commission-warning-on-removing-ink त्यामुळे शाई पुसण्याचा किंवा गैरप्रकार करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना केले आहे.
Powered By Sangraha 9.0