नागपूर,
musical experience नागपूरचे प्रतिभावान कलाकार सुरभी आणि सचिन ढोमणे एक अप्रतिम सांगीतिक मैफिल घेऊन येत आहेत. या कार्यक्रमात कुंदनलाल सैगल, पंकज मल्लिक, कानन देवी यांच्यासह इतर दिग्गज गायक व संगीतकारांची क्लासिक गाणी सादर करून बॉलीवूडच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली जाणार आहे.
या मैफिलीला डॉ. मनोज सालपेकर त्या काळातील रंजक आणि मजेदार किस्से-कहाण्यांच्या माध्यमातून रंगत आणणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, musical experience असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. सर्व संगीतप्रेमींना शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चिटणवीस सेंटर, नागपूर येथे या भव्य कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य: योगिता चौधरी, संपर्क मित्र