यवतमाळ,
Accelerating industrial development जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी विकास मीना एमआयडीसी तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईबी) पॉवर हाऊसला भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेतला.
एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा आणि वीजविषयक अडचणींबाबत जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांकडून माहिती घेतली. उद्योजकांना भेडसावणार्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित दिल्या. उद्योगवाढीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Accelerating industrial development औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष पाहणी करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रात वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिल्या. या पाहणीमुळे एमआयडीसीतील उद्योगांना दिलासा मिळणार असून जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी महाव्यवस्थापक सुनील गरुड, एमआयडीसीचे उपअभियंता नरेंद्र विंचुरकर, कनिष्ठ अभियंता चैताली गुडदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.