मुंबई महापालिकेत एआयएमआयएमची एंट्री; तीन जागांवर विजय

16 Jan 2026 12:45:51

AIMIM
 
मुंबई,
AIMIM's entry into Mumbai मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमने प्रभावी प्रवेश करत राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेतले आहे. बीएमसी निवडणुकीत एआयएमआयएमने सर्वांना आश्चर्यचकित करत मुंबईतील तीन वॉर्डमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. वॉर्ड क्रमांक १३५ मधून इरशाद खान, वॉर्ड क्रमांक १३४ मधून महजबीन अतीक अहमद आणि वॉर्ड क्रमांक १४५ मधून खैरुनिसा हुसेन यांनी विजय संपादन केला आहे. या यशामुळे मुंबईच्या महापालिका राजकारणात एआयएमआयएमची ठळक उपस्थिती निर्माण झाली असून, पारंपरिक राजकीय पक्षांसमोर नव्या राजकीय आव्हानाचे संकेत मिळत आहेत. बीएमसीत एआयएमआयएमची ही यशस्वी एंट्री आगामी राजकीय समीकरणे बदलणारी ठरते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0