आमगावच्या अक्षरची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

16 Jan 2026 18:59:57
आमगाव, 
दिल्ली येथे Akshar Gupta's selection: Magic Book of Records मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे आयोजित कार्यक‘मात आमगावच्या अक्षर प्रशांत गुप्ताची निवड करण्यात आली असून त्याचे नाव बहु-कौशल्यपूर्ण कार्यासाठी विक‘मात नोंदविण्यात आले आहे, दिल्ली येथे १० जानेवारी रोजी या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक‘माला मेजिक बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष डॉ. सी. पी. सोनी, वल्ड वाईड ट्रेनर डॉ. राजेंद्र सैनी, लिडरशीप ट्रेनर, लेफ्टनंट गणेश बाबु, चिफ वार्डन सिव्हिल डिफेन्स डॉ. सुनिलकुमार चव्हान उपस्थित होते. अक्षर गुप्ता हा आमगाव येथील विवेक मंदिर शाळेत पाचवीचा विद्यार्थी आहे.
 
 
Akshara
 
अक्षरने कमी वयातच त्याच्यातील कौशल्य व बुद्धीमत्तेची चुणूक दाखविली. अक्षरला गुरूजन व आईवडीलांचे नेहमी सहकार्य मिळत आहे. बहु-कौशल्यपूर्ण कार्यासाठी अक्षर दोन वर्षापासून परिश्रम घेत आहे. अखेर त्याचे परिश्रम फळाला आले.Akshar Gupta's selection: Magic Book of Records  मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याच्या कौशल्य व कार्याची दखल घेत मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली. मल्टी टॅलेंटसाठी त्याला मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अक्षर बुक रेकॉर्डमध्ये नाव नोंदणीसाठी वर्षभरापासुन प्रयत्नरत होता. शिक्षण क‘ीडा, कला, माडलींग क्षेत्रात आवड असल्याचे अक्षर सांगतो. त्याने यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केले आहे. अक्षरच्या यशाबदल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Powered By Sangraha 9.0