सहशिक्षक शेरेकर यांची तोंडी प्रतिनियुक्ती रद्द करा

16 Jan 2026 20:41:57
अन्यथा शाळेला कुलूप
शालेय व्यवस्थापन समितीची मागणी
हदगाव, 
हदगाव तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा वाळकी खुर्द येथील assistant teacher Sherekar. सहशिक्षक शेरेकर यांची दुसर्‍या करण्यात आलेली तोंडी प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे. यासंदर्भात समितीने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
 

sherekar 
 
निवेदनात जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेतच कार्यरत ठेवण्याचे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश असताना देखील शेरेकर यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी बुद्रुक (केंद्र येथे तोंडी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ही प्रतिनियुक्ती नियमबाह्य असून ती तत्काळ रद्द करून संबंधित शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत रुजू करण्यात यावे, अशी ठाम मागणी समितीने केली आहे.
 
 
assistant teacher Sherekar.  ही प्रतिनियुक्ती रद्द न झाल्यास शिक्षणाधिकारी, नांदेड यांच्याकडे लेखी तक‘ार दाखल करण्यात येईल. तसेच शालेय व्यवस्थापन समिती व गावकरी एकत्र येऊन कुलूप लावण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर कदम, उपाध्यक्ष भगवान गायकवाड, सरपंच शिवाजी कदम, भगवान कदम, आकाश शिंदे, उल्हास कदम, बालाजी कदम, भगवान गायकवाड यांच्यासह एकूण २३ जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Powered By Sangraha 9.0