मुंबई,
BJP is ahead in the state मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर २९ महापालिकांमध्ये मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे, तर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला जोरदार धक्का बसल्याचे दिसत आहे. आतापर्यंत राज्यभरात भाजपच्या जवळपास ४०० नगरसेवक आघाडीवर आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेचे १०० नगरसेवक आघाडीवर आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि सोलापूरसह राज्यातील मोठ्या महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर आहे. मुंबईत ठाकरेंची शिवसेना ६४ जागांवर आघाडीवर असून महायुती ८० जागांवर पुढे आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये मुंबईत भाजप ४२, ठाकरेंची शिवसेना २९, शिंदेंची शिवसेना १३, काँग्रेस ६ आणि मनसे २ नगरसेवक आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप खाते उघडता आलेले नाही.

मुंबईत ठाकरेंच्या सत्तेला आव्हान आहे, तर राज्यात भाजप क्रमांक एक पक्ष आहे आणि काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. पुण्यात भाजपने मोठी आघाडी घेतली असून ३९ जागांवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी १६ जागांवर पुढे आहे. ठाकरे आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार आघाडीवर आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने मुसंडी मारली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली असून ठाकरेंच्या सेनेनेही खाते उघडले आहे. भाजप फक्त ४ जागांवर आघाडीवर आहे. राज्यातील इतर ठिकाणी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही.
मुंबईमध्ये ठाकरे बंधू ६० जागांवर आघाडीवर असून शिंदे आणि भाजप ७५ जागांवर पुढे आहेत. काँग्रेस ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर आहे. एक्झिट पोलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला ६० जागा सांगितल्या होत्या, परंतु मतपेट्या उघडल्यावर त्यांच्या बाजूला कल येत असल्याचे दिसत आहे. संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत सुरु आहे; भाजप आणि शिंदेंची शिवसेना प्रत्येकी १० जागांवर आघाडीवर आहेत, तर एमआयएम ९ जागांवर पुढे आहे. ठाकरेंची शिवसेना ४ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे. अमरावतीत भाजप ७, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना प्रत्येकी ३ जागांवर आघाडीवर आहेत. निवडणूक प्रक्रियेत मार्कर शाई पुसली जात नसल्याचे आणि फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याची तक्रार मिळाल्याने निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.