पुण्यातील अवघ्या 22 वर्षांचीभाजपाची उमेदवार सई थोपटे विजयी

16 Jan 2026 19:55:20
पुणे, 
 
 
bjp-pune-sai-thopate अवघ्या 22 वर्षांच्या सई थोपटे हिच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 36 (क) मधून भारतीय जनता पक्षाकडून सई थोपटे ही महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार विजयी ठरली आहे. सई थोपटे सध्या पुण्यातील नामांकित महाविद्यालयमध्ये बीबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. रोजच्याप्रमाणे कॉलेजचा वर्ग सुरू असतानाच तिला पक्षाकडून फोन आला आणि उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती मिळाली. bjp-pune-sai-thopate अचानक मिळालेल्या या बातमीने सईचा आनंद गगनात मावेनासा झाला. वर्गातील मित्र-मैत्रिणींनी तिचे अभिनंदन केले आणि त्यानंतर सई थेट आपल्या प्रभागात पोहोचली. विद्यार्थिनी असतानाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा हा क्षण तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. दरम्यान, लवकरच पुणे आवृत्ती सुरु करणार असलेल्या तरुण भारत परिवाराकडून सईला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
 
 
 
bjp-pune-sai-thopate
 
(फोटो इंटरनेटवरून साभार)
 
bjp-pune-sai-thopate सई थोपटे गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदशी सक्रियपणे जोडलेली आहे. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून तिने पुण्यात विविध आंदोलनं, सामाजिक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि संघटनात्मक जबाबदाèया सांभाळल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक सुविधा, करिअरच्या संधी, तरुणांचे हक्क यावर तिने सातत्याने ठाम भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांमध्ये काम करताना मिळालेला अनुभव, संवादकौशल्य आणि संघटन क्षमता यामुळेच तिचे नेतृत्व अधिक ठळकपणे पुढे आले.
 
bjp-pune-sai-thopate सई थोपटे हिला राजकारणाचा वारसा लाभलेला आहे. तिचे वडील प्रशांत थोपटे हे मागील अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय पदाधिकारी आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी उपाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा निवडणूक संयोजक अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पर्वती, सहकारनगर आणि धनकवडी परिसरात घराघरात पक्ष पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पक्षनिष्ठेची आणि कार्यपद्धतीची दखल घेत पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सई थोपटे हिला पुणे महानगरपालिकेत प्रतिनिधित्वाची संधी दिल्याचे बोलले जात आहे.
Powered By Sangraha 9.0