कौटुंबिक वादातून वृद्धेवर हात उगारला सुनेला कारावास

16 Jan 2026 19:06:55
बुलढाणा, 
Buldhana: Family dispute कौटुंबिक वादातून वृद्ध सासूला ढकलून देत गंभीर दुखापत केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी सुनेस दोषी ठरवत तीन महिन्यांचा साधा कारावास आणि सहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल बुलढाणा येथील प्रथम वर्ग न्यायालय क्रमांक दोनने गुरुवारी दिला. या प्रकरणातील आरोपी मीनल पंकज राठोड (३२) हिने २४ ऑगस्ट २०२३ रोजी समर्थनगर परिसरातील निवासस्थानी झालेल्या वादात आपल्या ७९ वर्षीय सासू कमल श्रीराम राठोड यांना ढकलून दिल्याचे न्यायालयाने सिद्ध मानले. या घटनेत सासू जमिनीवर पडून त्यांच्या हाताला फॅचर झाले होते.
 
 
hamar
 
Buldhana: Family dispute  घटनेदरम्यान हस्तक्षेपासाठी आलेल्या पतीशीही आरोपीने झटापट केल्याचे तपासात पुढे आले. या प्रकाराबाबत शहर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. तपासाअंती पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा दोष सिद्ध झाल्याचे नमूद केले. प्रथम वर्ग न्यायालय क्रमांक दोनचे न्यायाधीश पंकज देशपांडे यांनी निकाल देताना दंडाच्या रकमेपैकी पाच हजार रुपये जखमी सासूस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे, तर उर्वरित रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वैशाली कस्तुरे यांनी काम पाहिले.
Powered By Sangraha 9.0