श्री साई शाळा व आकाश चिकटे स्पोर्टस् अकॅडमीचा पुढाकार
यवतमाळ,
राज्य परिवहन आगार यवतमाळ विभाग अंतर्गत राज्य परिवहन कर्मचारी, साई माध्यमिक विद्यालय लोहारा व आकाश चिकटे स्पोर्ट्स अकॅडमी यांनी पुढाकार घेत Bus station area cleanliness campaign बस स्थानक परिसराची स्वच्छता मोहीम राबविली. परिसरात मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी असते, हा परिसर कचरामुक्त व स्वच्छ असावा यासाठी प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी जीवनात स्वछतेचा मंत्र असायला हवा, असा संदेश यावेळी विद्यार्थी खेळाडू व एसटी कर्मचार्यांनी दिला. हाती झाडू व खराटा घेऊन संपूर्ण बसस्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला.

Bus station area cleanliness campaign या उपक्रमात एसटीचे विभाग अमृत कछवे, यंत्र अभियंता चव्हाण, आगार व्यवस्थापक दिवसे, सहायक कार्यशाळा अधीक्षक जेबी खान, वाहतूक निरीक्षक हरीश थोरात, वाहतूक नियंत्रक प्रकाश बहाड, कामगार सेनेचे आगार सचिव वाहक मनोज मह‘े, आकाश चिकटे स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष मनोज इंगोले, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे, साई विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय भटकर, क्रीडाशिक्षक जितेंद्र सातपुते, वनदेव माघाडे, डहाके, जयश्री देशमुख व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रवाशांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.