* काँग्रेस व जनविकास आघाडी 30 जागी विजयी
* त्याखालोखाल भाजपा व सेना युतीला मिळाल्या 24 जागा
* उबाठाने पटकावल्या 6 जागा, तर राकाँला मात्र भोपळा
चंद्रपूर,
Chandrapur Municipal Corporation महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी मुसंडी मारत काँग्रेस व मित्रपक्ष असलेल्या जनविकास आघाडीने 30 जागांवर संयुक्तरित्या विजय मिळविला आहे. 2017 मधील निवडणुकीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त जागा बळकावत काँग्रेस यंदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर, त्याखालोखाल भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीने 24 जागांवर यश संपादित केले आहे. उबाठाने पहिल्यांदा येथे चांगली कामगीरी करीत 6 जागांवर आपले नगरसेवक निवडूण आणले. तर वंचित, बसपा, एआयएमआयएमने प्रत्येकी 1 जागा प्राप्त केली आहे. राकाँ व विदर्भ किसान काँग्रेसला भोपळा मिळाला आहे.

चंद्रपूर महानगर पालिकेच्या 17 प्रभागासाठी 66 नगरसेवक निवडूण आणायचे होते. त्यासाठी जवळजवळ सर्व राजकीय पक्ष व अपक्ष असे एकूण 451 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शुक्रवारी सकाळी उशिरा सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी 7 वाजेपर्यंतही पूर्ण झाली नव्हती. शेवटी समोर आलेला निकाल हा काहीसा धक्कादायक राहिला. कारण भाजपा व सेना युतीला आणखी जास्त मिळतील असा सर्वांचा अंदाज होता. पण ‘अँटीइन्कम्बन्सी’ आणि पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये असलेला दुरावा, वेळेवर उमदेवारांची यादी बदल्याचा प्रचंड घोळ व राडा आदींमुळे हा पक्ष मागे पडला. तसे पाहिले तर काँग्रेसच्याही प्रमुख नेत्यांमध्ये कमालीचे वैरत्व होते. तरीही या पक्षाने सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिध्द केलेच. जनतेलाही बदल हवा होता, असा काहीसा संदेश या निकालातून दिसला.
Chandrapur Municipal Corporation या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या माजी नगरसेवक सुनिता लोढिया पराभूत झाल्या. सोबतच माजी महापौर व भाजपाच्या उमदेवार अंजली घोटेकर यांनाही पराभवाचे तोंड बघावे लागले. काँगे्रसचे विद्यमान अध्यक्ष संतोष लहामगे व माजी अध्यक्ष रामू तिवारी यांनाही जनतेने नाकारले. त्यामुळे एकीकडे काँगे्रस पक्ष सत्ता स्थापनेकडे आगेकुच करीत असताना, या काँगे्रसच्या दोन्ही प्रमुख उमेदवारांना यश संपादन करता आले नाही. तिकडे भाजपाच्या माजी महापौर राखी कंचर्लावार याही पराभूत झाल्या. सातत्याने यश संपादन करणारे माजी नगरसेवक संदीप आवारी यांनाही यावेळी यश आले नाही. रवी आसवानी यांनी भाजपाला सोडून शिवसेनेकडून उमदेवारी घेतली होती. पण सेना त्यांना वाचवू शकली नाही.
Chandrapur Municipal Corporation एकूण काय तर, लोकसभेच्या निवडणुकीपासून चंद्रपूर जिल्हा हा परत काँगे्रसकडे फिरला की काय, असे चित्र दिसत आहे. मधले विधानसभेचे तेवढे निकाल सोडले तर, नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीतही सर्वत्र भाजपा पुढे असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र मार खावा लागला होता. तर आता महानगपालिकेतही अपेक्षित यश भाजपाला प्राप्त करता आले नाही. तिसरी आघाडी म्हणून राकाँ (अजित पवार गट) आणि विदर्भ किसान मजदूर काँगे्रस मैदानात होती. त्यांनी 40 जागांवर उमदेवार उभे केले होते. शिवाय 12 जागां समर्थित होत्या. मात्र, तरीही एकाही जागेवर या आघाडीला यश मिळवता आले नाही. या आघाडीने मतांचे विभाजन न केल्यानेही काँग्रेसला लाभ झाल्याची चर्चा आहे.
पराभूत दिग्गज उमेदवार
* रामू तिवारी (काँग्रेस)
* संतोष लहामगे (काँग्रेस)
* रामू तिवारी (काँग्रेस)
* सुनिता लोढिया (अपक्ष)
* रवी आसवानी (शिवसेना)
* संदीप आवारी (भाजपा)
* अंजली घोटेकर (भाजपा)
* राखी कंचर्लावार (भाजपा)
* अजय सरकार (अपक्ष)
* सुनिता लोढिया (अपक्ष)
* अंजली घोटेकर (भाजपा)
विजयी शिलेदार
* नंदू नागरकर (काँग्रेस बंडखोर- अपक्ष)
* संगिता अमृतकर (काँग्रेस)
* संजय कंचर्लावार (भाजपा)
* सुनिता लोढिया (अपक्ष)
* वसंत देशमुख (काँग्रेस)
* प्रदीप देशमुख (जनविकास आघाडी)
* प्रज्ज्वलंत कडू (भाजपा)
* राहुल घोटेकर (काँग्रेस)
* सुभाष कासनगोट्टूवार (भाजपा)
* राहुल पावडे (भाजपा)
* संविता काबंळे (भाजपा)
अटीतटीच्या लढती
प्रभाग क्रमांक 4 मध्ये मनसेचे सचिन भोयर अवघ्या 34 मतांनी पराभूत झाले. येथे काँग्रेसच्या संगिता भोयर यांनी त्यांचा पराभव केला. बाबुपेठ प्रभागात काँगे्रसचे विनोद लभाने यांनी अपक्ष उमदेवार स्नेहल रामटेके यांचा केवळ 22 मतांनी पराभव केला. लालपेठ कॉलरी प्रभागात काँगे्रसच्या चंदा वैरागडे यांनी भाजपच्या कल्पना बगुलकर यांचा 42 मतांनी केलेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. विवेक नगर प्रभागात भाजपाचे संदीप आवारा यांचाही केवळ 23 मतांनी पराभव झाला. त्यांना काँग्रेसचे अभिषेक डोईफोडे यांनी हरवले.
भोंगळ व्यवस्थेत झाली मतमोजणी
अतिशय वर्दळीच्या आणि मुख्य मार्गाला लागून असलेल्या मनपाच्या प्रभाग 3 मधील कार्यालयात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तर आतही सारी अव्यवस्था होती. निकाल घोषित करणारे जुने भोंगे मध्येच बंद पडत होते. प्रसार माध्यमाचे कक्ष मतमोजणीच्या कक्षापासून खुपच लांब असून, तेथे पंखेही नव्हते. प्रचंड तापत असल्याने पत्रकार बाहेर बसले होते. जेवणही निकृ ष्ट दर्जाचे होते. एकूण सगळीचे अव्यवस्था होती.