दादा लाड डॉक्टर ऑफ सायन्सने सन्मानित

16 Jan 2026 19:21:25
पारवा, 
भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने २७ व्या समारंभात Dada Lad was honored with a Doctor of Science degree. ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या अनुषंगाने भारतीय किसान संघ विदर्भ प्रांतातर्फे केळवद येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुळकर्णी, अखिल भारतीय जैविक प्रमुख नाना आखरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुकुट भिसे, विदर्भ प्रांतमंत्री कैलास ढोले, विदर्भ प्रांताध्यक्ष बापुराव देशमुख, ढोबळै, विदर्भ प्रांत संघटनमंत्री खंडेराव कुळकर्णी, दिलीप पाटील, प्रशांत गुप्ता, चंदन धामंदे, राहुल राठी, विदर्भ प्रांत युवा प्रमुख राम जिल्लडवार उपस्थित होते.
 
 
dada
 
विद्यापीठाच्या सुवर्णजयंती दीक्षांत सभागृहात त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवी प्रदान करण्यात आली आहे. दादा लाड १९६८ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्रांत, विभाग आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्तDada Lad was honored with a Doctor of Science degree.  ‘दादा लाड कापूस तंत्रज्ञान’ २००२-०३ पासून शेतकरी संशोधनातून त्यांनी कापूस पिकात उत्पादकता कमी करणार्‍या गळफांदीचा अभ्यास केला. त्यांच्या प्रारंभिक छाटणीची पद्धत विकसित केली. शेंडा खुडणी, अती घन लागवड, ठिबक प्रणाली व आच्छादन यांचा एकत्रित वापर त्यांनी कापूस पिकासाठी एक समग‘, वैज्ञानिक व नफा वाढवणारे तंत्रज्ञान विकसित केले. या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते, बोंडांचे वजन जास्त होते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक कालावधी घटतो आणि शेतकर्‍यांचा नफा लक्षणीयरीत्या वाढतो.
 
 
 
हे तंत्रज्ञान वनामकृवि परभणी, अकोला, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ राहुरी व सीआयसीआर नागपूर त्रिशतकीय परीक्षांद्वारे वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित केले आहे. यामुळे उत्पन्नात ४४ टक्के वाढ नोंदली आहे. २०२४ मधील ५२ व्या संयुक्त अ‍ॅग‘ेस्कोमध्ये या तंत्रज्ञानास अधिकृत मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगण राज्यातील हजारो शेतकर्‍यांनी आज हे तंत्रज्ञान स्वीकारले. कृषी नवोन्मेषासोबतच, दादा लाड यांनी लाल कंधारी गुरांच्या संवर्धनासाठी ४० अधिक वर्षे अविरत योगदान दिले आहे.
 
 
Dada Lad was honored with a Doctor of Science degree.  या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कृषी तंत्रज्ञ पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा फेलो फार्मर पुरस्कार, माफसू नागपूरचा विशेष सन्मान, गोसेवा पुरस्कार तसेच दूरदर्शन मुंबईच्या राज्य कृषी कार्यक‘म समितीचे सदस्य आणि सीआयसीआर नागपूर व्यवस्थापन समिती सदस्य अशी मान्यताप्राप्त पदे आणि गौरव त्यांना लाभले आहेत.
Powered By Sangraha 9.0