बॉलीवूड अभिनेता दीपक तिजोरींची मोठी फसवणूक!

16 Jan 2026 11:48:26
मुंबई,
Deepak Tijori बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते दीपक तिजोरी हे मोठ्या आर्थिक फसवणुकीला बळी पडल्याची घटना समोर आली आहे. आपल्या आगामी चित्रपट प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या प्रयत्नात त्यांची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, याप्रकरणी बांगूर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी कविता शिबाग कूपर, फौजिया अर्शी आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना गोरेगाव परिसरात घडल्याचे समजते.
 

Deepak Tijori, Bollywood actor Deepak Tijori, 
दीपक तिजोरी Deepak Tijori हे गेली अनेक दशके हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. १९९० च्या दशकातील गाजलेल्या ‘आशिकी’ चित्रपटामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. अभिनेता म्हणून यश मिळवल्यानंतर त्यांनी चित्रपट निर्मितीकडेही वाटचाल केली आहे. सध्या ते डिसेंबर २०२४ पासून त्यांच्या आगामी हिंदी चित्रपट ‘टॉम, डिक अँड हॅरी २’च्या पटकथेवर काम करत होते आणि त्यासाठी निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.
 
 
तक्रारीनुसार, निधी Deepak Tijori उभारणीदरम्यान एका मित्रामार्फत दीपक तिजोरी यांची ओळख कविता कूपरशी झाली. कविताने स्वतःची ओळख प्रसिद्ध संगीत कंपनी टी-सीरीजशी संबंधित व्यक्ती म्हणून करून दिली. पुढील भेटीत तिने झी नेटवर्क आणि मीडिया इंडस्ट्रीमध्ये आपले चांगले संबंध असल्याचा दावा करत, चित्रपटासाठी गुंतवणूक मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर तिजोरी यांना समजले की कविता कूपरने यापूर्वीच टी-सीरीजमधून राजीनामा दिला होता.
 
 
फेब्रुवारी २०२५ मध्ये, कविताने तिजोरी यांची ओशिवरा येथील तिच्या घरी फौजिया अर्शीशी ओळख करून दिली. फौजियाने स्वतःची ओळख चित्रपट निर्माती म्हणून करून देत, लवकरच एअरलाइन कंपनी सुरू करणार असल्याचे सांगितले. तिने झी नेटवर्कमधील संबंधांचा हवाला देत, त्या कंपनीकडून एक अधिकृत पत्र मिळवून देऊ शकते, असे सांगितले. हे पत्र मिळाल्यास गुंतवणूकदार मिळवणे सोपे होईल, असा विश्वास तिने दिला.
 
 
लाख रुपयांची मागणी
या पत्रासाठी फौजियाने Deepak Tijori पाच लाख रुपयांची मागणी केली असून ही रक्कम अडीच लाख रुपयांच्या दोन हप्त्यांत देण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्यानुसार, २२ फेब्रुवारी रोजी दीपक तिजोरी यांनी फौजिया अर्शीच्या खात्यात संपूर्ण रक्कम हस्तांतरित केली. विश्वास संपादन करण्यासाठी, एका फोन कॉलमध्ये एका व्यक्तीने स्वतःची ओळख झी नेटवर्ककडील ‘जोशी’ अशी करून दिली आणि आठवड्यात पत्र देण्याचे आश्वासन दिले. यासाठी करारही करण्यात आला.मात्र, पैसे दिल्यानंतरही कोणतेही पत्र किंवा कागदपत्र मिळाले नाही. त्यानंतर संबंधितांनी तिजोरी यांचे फोन उचलणे बंद केले. संशय बळावल्याने त्यांनी स्वतः चौकशी केली असता, झी नेटवर्कमध्ये ‘जोशी’ नावाची कोणतीही व्यक्ती नसल्याचे उघड झाले. मोठ्या कंपन्यांची नावे वापरून आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात येताच, दीपक तिजोरी यांनी बांगूर नगर पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांनी कविता कूपर, फौजिया अर्शी आणि त्यांच्या सहकाऱ्याविरुद्ध फसवणूक व विश्वासघाताचे गुन्हे दाखल केले आहेत. लवकरच आरोपींना चौकशीसाठी बोलावले जाणार असून, तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0