दिग्रस नपच्या विविध विभागांच्या सभापतींची निवड

16 Jan 2026 19:35:49
दिग्रस, 
Election of the Chairman: Digras Council परिषदेच्या विविध विभागांच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया शुक्रवार, १६ जानेवारीला शांततेत व उत्साहात पार पडली. या निवडीत पाणीपुरवठा विभागाच्या सभापतीपदी नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगीनवार, बांधकाम विभागाच्या सभापतीपदी नूर मोहम्मद खान, शिक्षण विभागाच्या सभापतीपदी डॉ. संजय बंग, आरोग्य विभागाच्या सभापतीपदी वैशाली दुधे, नियोजन विभागाच्या सभापतीपदी बाळू जाधव, महिला व विभागाच्या सभापतीपदी स्वाती धाडवे तर उपसभापतीपदी कविता सुकळकर यांची निवड करण्यात आली आहे.
 
 
Sabhapati
 
Election of the Chairman: Digras Council  यासह स्थायी समिती सदस्य म्हणून शगुफ्ता परवीन सय्यद अक्रम व लक्ष्मी मेहता यांची निवड करण्यात आली. या निवड प्रकि‘येसाठी दारव्हा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचे उपस्थित अभिनंदन करण्यात आले. नगर परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0