आर्णी नपत सभापतींची निवड

16 Jan 2026 19:42:08
तीन सभापती पदांसाठी निवडणूक तर दोन अविरोध

आर्णी, 
Election of the chairman in Arni Municipal Council आर्णी नगरपरिषदेत शुक्रवार, १६ जानेवारी रोजी सभापती पदासाठी निवड पार पडली. यामध्ये दोन सभापती निवड अविरोध झाली तर तीन सभापतीपदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवावी लागली. यात महायुतीचे नगरसेवक विजयी झाले तर काँग्रेस नगरसेवकांचा पराभव झाला. या प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उमरखेडचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे होते. तर मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांनी नामांकन अर्ज स्वीकारले.
 
 
Aarsni
 
आर्णी नगरपरिषदेत सभापती पदासाठी निवड नगरपरिषदेच्या सभागृहात नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. नप मुख्याधिकार्‍यांनी दुपारी १२ वाजेपासून नामांकन अर्ज मागवले. आर्णी नपत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने स्थिती त्रिशंकू झाली आहे. २२ सदस्यात काँग्रेसला ८, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ८, शिवसेना ४, भाजपा १, शिवसेना उबाठा १ असे बलाबल आहे. तर १४ नगरसेवकांची महायुती तयार यात राकाँ (अप) ८, शिवसेना ४, भाजपा १, शिवसेना उबाठा १ चा समावेश आहे. तर काँग्रेस विरोधात आहे.
 
 
सभापती निवडीत बांधकाम समितीच्या सभापतीपदी अंजली संदीप खंदार, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी छबू मनोज चारोडे यांची अविरोध निवड झाली. तर शिक्षण समिती सभापती पदासाठी महायुती कडून संजय व्यवहारे, काँग्रेस कडून शफी रझाक मलनस उमेदवारी अर्ज दाखल केला. आरोग्य सभापती पदासाठी महायुतीच्या वतीने अन्वर खान सरदार खान पठाण, काँग्रेस च्या वतीने रियाज सय्यद सय्यद वहाब, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी महायुतीच्या वतीने चैताली विशाल देशमुख व काँग्रेस च्या वतीने प्रीती योगेश शिवरामवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
 
 
Election of the chairman in Arni Municipal Council  यात यामध्ये शिक्षण समितीच्या सभापती पदासाठी महायुतीचे बंडू व्यवहारे, स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती पदासाठी महायुतीचे अन्वर खान सरदार खान पठाण आणि महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीसाठी महायुतीच्या चैताली विशाल देशमुख यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारांना ३ विरुद्ध २ मतांनी पराभूत करून सभापतीपदाला गवसणी घातली. तर याच समितिच्या उपसभापतीपदी उबाठा शिवसेनाच्या शितल प्रविण काळे अविरोध निवड झाली. नगर परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गावंडे हे वित्त आणि नियोजन समितीचे विद्यमान सभापती राहणार आहेत. तर स्थाई समितीचे अध्यक्ष नालंदा भरणे, उपाध्यक्ष नीलेश गावंडे, अंजली खंदार, छबू चारोडे, अन्वर पठाण, संजय व्यवहारे, चैताली देशमुख, शितल काळे महिला व बालकल्याण समिती उपसभापती सदस्य असणार आहेत.
 
 
ही घोषणा पीठासीन उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम प्रकाश मुळे यांनी मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांच्या उपस्थितीत केली. यावेळी महायुती, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यूपी गटाचे नेते निलोफर साजिद बेग, साजिद बेग, सुनील पोडगंटीवार, सादिक शेख, शेखर खंडार, शिवसेनेचे डॉ. विष्णू उकांडे, राजेंद्र जाधव, सुरेश पवार, मनोज चारोडे, विनोद लोहट, गोपाल बांगर, भाजपाचे विपिन राठोड, चव्हाण, अशोक चव्हाण उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0