आरडीच्या नावे पावणे चार लाखांनी फसवणूक

16 Jan 2026 20:50:43
वर्धा, 
आर. डी.च्या नावाने दाम्पत्याची तब्बल पावणे चार लाखांनी Fraud फसवणूक करण्यात आली. ही घटना वैशालीनगर येथे उघडकीस आली. मनोहर मेंढे (५३) रा. वैशालीनगर यांनी चरणदास खैरकार रा. रामनगर याच्याकडे फेब्रुवारी २०२० ते जानेवारी २०२५ पर्यंत पोस्टाची दरमहा ५ हजार रुपये आणि ज्योती खैरकार हिच्याकडे पत्नीच्या नावाने दरमहा २ हजार रुपयांची, अशा दोन वेगवेगळ्या आरडी काढल्या होत्या. हे दोघेही पैसे घेण्याकरिता मेंढे यांच्या घरी येत होते.
 
 
fraud
 
आतापर्यंत त्यांनी ५४ हप्त्यांचे पैसे धनादेशाने व सहा हप्त्यांचे पैसे रोख चरणदास खैरकार याच्याकडे दिले होते. आर. डी. जानेवारी महिन्यात पूर्ण झाल्याने त्यांनी पासबुक परत मागितले. परंतु, चरणदासने पासबुक देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली असता आरडीच्या दिलेल्या ६० हप्त्यांपैकी केवळ ६ हप्ते भरल्याचे दिसून आले. त्यांची तब्बल ३ लाख ७८ हजार रुपयांनी Fraud फसवणूक केली. तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
Powered By Sangraha 9.0