गौरी लंकेश हत्या प्रकरणआरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिकेत विजयी

16 Jan 2026 19:36:26
जालना,
 
gauri-lankesh-murder पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांचा जालना (jalna) महानगरपालिका निवडणुकीत विजय झाला आहे. निवडणुकीच्या आधी श्रीकांत पांगारकर यांची शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) (shivsena-eknath shinde)जालना विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. पण, टीका झाल्यानंतर ही नियुक्ती रद्द करून पांगारकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आता पांगारकर यांना जनतेने निवडून दिले आहे.
 
 

gauri-lankesh-murder 
 (फोटो इंटरनेटवरून साभार)
 
gauri-lankesh-murder ऑगस्ट 2018 मध्ये दहशतवादविरोधी पथकाने मुंबईनजिकच्या नालासोपारा भागातून क्रूड बाँब, देशी बनावटीच्या बंदुका यांच्यासह मोठी स्फोटक सामग्री हस्तगत केली होती. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पांगारकरला अटक करण्यात आली होती. पांगारकर हे लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी असून, काही दिवसांपूर्वीच त्यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्यांना माजी मंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत जालना विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 13 (ड) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.
 
 
 
gauri-lankesh-murder निवडणूक जिंकल्यानंतर श्रीकांत पांगारकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करताना दिसले. याच प्रकरणी श्रीकांत पांगारकर या शिवसेनेच्या जालन्याच्या माजी नगरसेवकालाही दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. राज्यात अनेक ठिकाणी हल्ले करण्याच्या कटासाठी आर्थिक रसद पुरवण्याची कामगिरी पांगारकरवर होती, असा आरोप आहे. पांगारकर हे 2001 ते 2011 या कालावधीदरम्यान जालना नगरपालिकेत दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र मागील काही काळात त्यांचा कुटुंबासह मुक्काम औरंगाबादला होता.
Powered By Sangraha 9.0