प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही

16 Jan 2026 21:57:03
प्रभाग मध्ये भाजपचे वर्चस्व
लकडगंज झोन समोर भाजप कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोष
 
नागपूर,
guarantee of all-round development महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मधून भाजपने क्लीन स्वीप करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. या प्रभागातील अ, ब, क आणि ड गटातील चारही उमेदवार भाजपचे असून मतदारांनी भाजपवर ठाम विश्वास व्यक्त केल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. सर्व उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे. अ गटातून बाळू रारोकर (भाजप) यांनी तब्बल १७,००२ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. तर रा.काँ.चे प्रशांत बनकर यांनी ५,४९६ मते मिळविली.
 
 
l bjp
 
guarantee of all-round development  तसेच ब गटातून अर्चना पडोळे (भाजप) यांनी १८,३९३ मते मिळवत विजयाची पताका फडकावली. क संतोष देवी लढढा (भाजप) यांनी १६,५७६ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर सरशी साधली. रा.काँ.च्या सारिका ताटे यांनी ७२६३ मते मिळविली. तर ड गटातून बाल्या बोरकर (भाजप) यांनी १४,९६४ मते मिळवत विजय नोंदवला आहे. तर रा.काँ.चे दुनेश्वर पेठे यांनी १०,५९६ मते मिळविली. या निकालामुळे प्रभाग २३ मध्ये भाजपचे वर्चस्व अधोरेखित झाले असून ताकद आणि स्थानिक पातळीवरील कामगिरीचा भाजपला मोठा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि विकासकामे हे प्रमुख मुद्दे राहिले. निकाल जाहीर होताच लकडगंज झोन समोर भाजप कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोष साजरा केला.
Powered By Sangraha 9.0