नवीन रस्ता न केल्यास आंदोलनाचा इशारा
मारेगाव,
एकाच रस्त्याला वारंवार पॅचेस केल्यामुळे वनोजादेवी ते Hivara Majra Road हिवरा मजरा या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या १२ ते १५ वर्षांत या रस्त्यावर केवळ खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपाच्या या कामामुळे रस्त्याची समस्या कायमची सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये लाट उसळली आहे. वनोजा देवी ते हिवरा मजरा हा रस्ता मागील काही वर्षांपूर्वी बनविण्यात आला होता. खड्डे पडल्यावर या रस्त्यावर वारंवार डागडुजी केल्या गेली. परंतु रस्त्याचे नूतनिकरण मात्र केल्या गेले नाही. सध्याच्या परिस्थितीत हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचार्यांसाठीही हा मार्ग धोकादायक ठरत आहे.

Hivara Majra Road पावसाळ्यात मोठमोठे खड्डे तयार होतात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. शालेय वाहने, रुग्णवाहिका तसेच दैनंदिन प्रवास करणार्या नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधीत विभागाकडून दरवेळी फक्त खड्डे भरण्याचे काम करण्यात येत असून रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण केले जात नाही. त्यामुळे काही दिवसांतच रस्ता पुन्हा खराब होत आहे. हा नवीन आणि दर्जेदार तयार करून देण्यात यावा, अन्यथा युवा एकता ग्रामविकास, हिवरामजरा यांच्या वतीने तीव‘ आंदोलनाचा इशारा देण्यात आला. संबंधित विभागाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी ग‘ामस्थांकडून करण्यात येत आहे.