नवी दिल्ली,
ICC issues ultimatum to Bangladesh टी20 वर्ल्ड कप 2026 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये होणार असून 20 संघ सहभागी आहेत. मात्र, वर्ल्ड कपच्या सुरूवातीसच भारताशी वाद निर्माण झाल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचा हवाला देत त्यांच्या संघाला भारतात सामने खेळण्यास नकार दिला. त्यांनी आयसीसीला याबाबत पत्र पाठवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला 21 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे अल्टिमेटम दिले आहे. आयसीसीने स्पष्ट केले की बांगलादेश संघ भारत दौऱ्यासाठी तयार झाला नाही तर त्याऐवजी स्कॉटलंडला टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सामील होण्याची संधी दिली जाईल. स्कॉटलंडची सध्याची टी20 रँकिंगही उत्तम असल्याने हा निर्णय शक्य आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर वाढत असलेले अत्याचार, तसेच आयपीएल 2026 साठी केकेआर संघातून बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजूर रहमानला रिलीज करणे या मुद्द्यांमुळे बांगलादेश बोर्डाने संघाला भारतात पाठवण्यास नकार दिला. त्यांनी पाकिस्तानप्रमाणे सामने श्रीलंकेत खेळवावे अशी मागणी केली होती, परंतु आयसीसीने ते शक्य नसल्याचे स्पष्ट केले. आयसीसीने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आश्वासन दिले, तरीही बांगलादेशने हट्ट केला, आणि आता 21 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा लागणार आहे.
बांगलादेश क्रिकेट संघात लिटन दास (कर्णधार), तन्झिद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, काझी नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब, तस्किन इस्लाम, शैफ उद्दीन आणि शोरिफुल इस्लाम यांचा समावेश आहे.