झारखंड आरोग्य विभाग सतर्क: निपाह विषाणूची पाहणी वाढवण्याचे निर्देश

16 Jan 2026 13:20:45

रांची,
nipah virus पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, झारखंड आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. आरोग्य विभागाने सिव्हिल सर्जनना निर्देश दिले आहेत की, संभाव्य धोका ओळखण्यासाठी आणि देखरेख वाढवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानुसार, झारखंडमध्ये आतापर्यंत निपाहचे पुष्टी झालेले रुग्ण नाहीत, परंतु बाधित भागातील लोकांची हालचाल संभाव्य धोका निर्माण करू शकते.

 

nipah virous 
 
 
लक्षात ठेवावयासारखी लक्षणे
अतिरिक्त मुख्य सचिव अजय कुमार यांनी सांगितले की, निपाह विषाणू अत्यंत संसर्गजन्य असून मृत्युदर जास्त आहे. या विषाणूची मुख्य लक्षणे:

उच्च ताप
  • डोकेदुखी आणि चक्कर
  • खोकला, श्वास घेण्यास त्रास
  • घसा खवखवणे
  • मानसिक स्थितीतील बदल
  • झटके किंवा कोमा

वटवाघळांपासून किंवा दूषित फळे, कच्चा खजूराचा रस, तसेच संक्रमित व्यक्तींच्या शारीरिक द्रवपदार्थांच्या संपर्कातून हा विषाणू पसरू शकतो.

जिल्ह्यांना जारी सूचनाः
  • निपाह प्रभावित भागातून येणाऱ्या व्यक्तींची विशेष तपासणी आणि देखरेख.
  • सर्व संशयित प्रकरणांची त्वरित एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) कडे नोंद.
  • गंभीर लक्षणे किंवा श्वसनाचा त्रास असलेले रुग्ण ताबडतोब अलग ठेवणे व प्रगत वैद्यकीय सेवेसाठी पाठवणे.
  • सर्व आरोग्य संस्थांमध्ये संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण (IPC) प्रोटोकॉलचे काटेकोर पालन.

जनतेसाठी सूचना
  • गळून पडलेली फळे किंवा कच्चा खजूराचा रस किंवा ताडी पिणे टाळा.
  • अनावश्यक जवळचा संपर्क टाळा.
  • लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

सदर उपाययोजनांअंतर्गत, रांचीतील रिम्स क्वारंटाइन वॉर्डमध्ये २२ बेड तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी, १३ जानेवारी रोजी आरोग्य विभागाने लोकांना सतर्क ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली होती.nipah virus निपाह विषाणू हा अधिसूचित आजार असून, त्याचा प्रसार जलद होऊ शकतो आणि मृत्यूदर जास्त असल्यामुळे सतर्कता आवश्यक आहे.

Powered By Sangraha 9.0