प्रेक्षकांसाठी खास 'ब्यूटी क्वीन' साई पल्लवी जुनैद एकत्र

16 Jan 2026 11:54:31
मुंबई,
Junaid Khan Sai Pallavi ‘महाराज’ आणि ‘लव्हयापा’नंतर अभिनेता जुनैद खान आता आणखी एका नव्या बॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘एक दिन’ असे या चित्रपटाचे नाव असून, नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरसोबतच चित्रपटाची अधिकृत रिलीज तारीख जाहीर झाल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Junaid Khan Sai Pallavi Bollywood debut 
‘एक दिन’मध्ये जुनैद खानसोबत लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे साई पल्लवी बॉलीवूडमध्ये मोठी एन्ट्री करत असून, तिच्या सहभागामुळे चित्रपटाबाबत विशेष चर्चा रंगू लागली आहे. तेलुगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांतील दमदार अभिनयामुळे साई पल्लवीने देशभरात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, ती साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
 
 
१५ जानेवारी २०२६ रोजी आमिर खान प्रोडक्शन्सने ‘एक दिन’चे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. या पोस्टरमध्ये बर्फाच्छादित परिसरात जुनैद खान आणि साई पल्लवी रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. कडाक्याच्या थंडीत दोघेही आईस्क्रीमचा आनंद घेताना दिसत असून, पोस्टरमधून चित्रपटातील प्रेमकथेची हलकी, भावनिक झलक समोर येते. पोस्टरसोबत “जीवनाच्या गोंधळात, प्रेम तुम्हाला एक दिवस शोधेल” अशी भावनिक ओळही देण्यात आली आहे. या पोस्टरमुळे दोघांच्या केमिस्ट्रीबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतानाच, पहिला टीझर १६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. या टीझरमधून चित्रपटाची कथा, वातावरण आणि प्रमुख पात्रांची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 
 
‘एक दिन’चे दिग्दर्शन Junaid Khan Sai Pallavi  सुनील पांडे यांनी केले असून, चित्रपटाची कथा स्नेहा देसाई आणि स्पंदन मिश्रा यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती मन्सूर खान, आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. संगीत राम संपत यांचे असून, गीतलेखन इर्शाद कामिल यांनी केले आहे.जुनैद खानचा हा तिसरा चित्रपट असून, यापूर्वी तो ‘महाराज’ आणि ‘लव्हयापा’मध्ये झळकला आहे. तर साई पल्लवी लवकरच रणबीर कपूरसोबत ‘रामायण’ या भव्य प्रकल्पातही दिसणार आहे. ‘एक दिन’मधील या नव्या जोडीकडून एक भावस्पर्शी आणि लक्षवेधी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0