नागपूर,
Pandit Bachraj Vyas Vidyalaya पंडित बच्छराज व्यास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “समृद्ध भारतासाठी सात शक्तींना जागृत करूया” या संकल्पनेवर आधारित सप्तशक्ती संगम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्य वक्त्या प्रा. निवेदिता वझलवार यांनी संयम, क्षमा, कीर्ती, वाणी, समृद्धी आणि बुद्धिमत्तेच्या मूल्यांवर मातापालिकांना मार्गदर्शन केले, तर अर्चना जैनाबादकर यांनी पर्यावरण संतुलनासाठी मानवाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कविता मोहरील यांनी आदर्श पालकत्वाचे महत्त्व सांगितले.

‘हम ही मातृशक्ती’ गीताचे सादरीकरण झाले, तसेच मातापालिकांनी अनुभव कथन केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर, किरण बेदी, आनंदीबाई जोशी यांची वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. आदर्श माता-पालिका रुपाली लाखे, देशपांडे, गिरडकर व सरनाईक यांचा सन्मान करण्यात आला. Pandit Bachraj Vyas Vidyalaya शाळेच्या प्रधानाचार्य अंजली तिजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा वाटकर, प्रास्ताविक भाग्यश्री जहागीरदार आणि आभार प्रदर्शन ज्योती व्यास यांनी केले. मकरसंक्रांतीच्या औचित्याने सर्वांना तिळगुळ देऊन स्वागत करण्यात आले.
सौजन्य: उषा भांडारकर, संपर्क मित्र