पुसद,
पतंग उडवण्यासाठी शहरात Nylon Manja नायलॉन मांजाचा वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मांजाचा वापर करणार्या जणांवर शहर पोलिसांनी त्वरित कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. रोहिदास पुंजाजी भारस्कर (सुभाष वार्ड), गोपाल परसराम पोराजवार (गणेश वार्ड), संतोष नारायण पोराजवार (सुभाष वार्ड), मनोज महावीर चौधरी (आंबेडकर वार्ड), कैलास ओंकार जोशी (सुभाष वार्ड), सुरेश चंद्रभान खरात (सुभाष वार्ड), स्वप्निल सुभाष चव्हाण, हिरामण बबन राठोड (पूस नदीच्या बांधाजवळ), विजय व्यवहारे (सुभाष वार्ड), संतोष तानाजी मुखरे (गणेश वार्ड) व विशाल अशोक हंस (वाशिम रोड पुसद) या ११ जणांविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहर पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गुन्हे दाखल झालेल्या ११ जणांनी Nylon Manja अवैध मांजाचा वापर करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर दाखल झाल्याने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकार्यांच्या पथकातील उमेश राठोड, अभिजित सांगळे, गजानन चव्हाण, नीलेश आडे, संतोष सरकुंडे, सुनील चिरमाडे, मुरलीधर पांडुळे, गजानन जाधव यांनी केली. नागरिकांनी मांजाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आला असून नायलॉन मांजाचा वापर करणार्याची माहिती दिल्यास व त्याचे सांगणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.