रूचीराची रूची कुंचल्यात; संस्कृती, श्रद्धा व सर्जनशीलतेचे दर्शन

16 Jan 2026 17:54:53
प्रशिक्षणाशिवाय बोलके चित्र
 
आशिष धापुडकर
 
सेलू,
तालुयातील घोराड येथील अकराव्या वर्गात शिकत असलेल्या Painting: Ruchira Dhongde रुचीरा धोंगडे हिने चित्रकलेतून संस्कृती, श्रद्धा व आधुनिक सर्जनशीलतेचा सुंदर संगम साकारला आहे. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता रूचिराने चित्रात जीव ओतल्याने ती चित्र बोलके झाले.
 
 
Rkuchi
 
Painting: Ruchira Dhongde  रूचिराने तयार केलेल्या विविध छायाचित्रांतून भारतीय परंपरा, धार्मिक भावना तसेच समकालीन कलाशैली प्रभावीपणे मांडली आहे. रुचिराच्या चित्रांमध्ये राजदरबारी दृश्य, भतिभावाने नटलेली देवतांची रूपे, गणेशाचे रंगीबेरंगी आधुनिक चित्रण तसेच लोकप्रिय अ‍ॅनिमेशन शैलीतील कलाकृतींचा समावेश आहे. प्रत्येक चित्रात रंगसंगती, रेखाटनातील अचूकता आणि भावभावनांची अभिव्यक्ती ठळकपणे दिसून येते. विशेषतः गणेशचित्रात आधुनिक आणि पारंपरिक शैलीचे मिश्रण लक्षवेधी ठरते. ऐतिहासिक पृष्ठभूमीवरील चित्रांमधून मराठी संस्कृतीची समृद्ध परंपरा अधोरेखित होते. ग्रामीण भागातील तरुणीने चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता चित्र रंगवले आहे
Powered By Sangraha 9.0