शारदा ज्ञानपीठच्या विद्यार्थिनीला विदर्भस्तरीय विज्ञान महोत्सवात द्वितीय क्रमांक

16 Jan 2026 19:17:21
बुलढाणा, 
Sharvari Deshmukh, Second Place विदर्भस्तरीय विज्ञान महोत्सव स्पर्धेत शारदा ज्ञानपीठ बुलढाणा ची कु. शर्वरी शिवाजी देशमुख हिने विज्ञान उपकरण या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून शारदा ज्ञानपीठच्या नावलौकिकात भर घातली आहे. धरमपेठ, नागपूर येथील म. पा. देव स्मृती महाविद्यालय येथे विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
sharavari
 
तसेच विज्ञान भारती व अशीरा इंग्लिश स्कूल व महाविद्यालय, काळेगाव (ता. खामगाव, जि. बुलढाणा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान महोत्सव स्पर्धेत शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा येथील विद्यार्थिनी कु. शर्वरी शुभांगी शिवाजी देशमुख हिने विज्ञान उपकरण या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता. विदर्भस्तरीय विज्ञान स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यशामुळे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
 
 
Sharvari Deshmukh, Second Place या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अंतरकर, उपमुख्याध्यापक दिपक देशपांडे, व्यवस्थापिका जोत्सना जगताप , तसेच शाळेचे अध्यक्ष डॉ. विद्यानंद देशपांडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. तुषार महाजन, सचिव अ‍ॅड. रामानंद कवीमंडन, शाळेचे व्यवस्थापक अ‍ॅड. आनंद चेकेटकर व शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे यांनी कु. शर्वरीचे अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0