उमरखेड नगरपालिकेत जनशक्ती पॅनलचे वर्चस्व

16 Jan 2026 20:35:18
शे. जुबेर कुरेशी, गोपाल अग्रवाल, अ‍ॅड. नाईक, अ‍ॅड. गुजरे यांचा समावेश

उमरखेड, 
उमरखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्ताकेंद्रातील महत्त्वाच्या घडामोडींना शुक‘वारी पूर्णविराम मिळाला. नगरपरिषद सभागृहात झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रकि‘या पार पडली. या निवडीत Umarkhed: Dominance of Janashakti Panel जनशक्ती पॅनलचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
 
 
jan shaktsi
 
नप अध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी तेजश्री जैन व अजय कुरवाडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनशक्ती पॅनलकडून शे. जुबेर शे. सम्मद कुरेशी यांनी विजय मिळविला. भारतीय जनता पार्टीकडून अमोल तिवरंगकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. झालेल्या मतदानात शे. कुरेशी यांना १७ मते, तर तिवरंगकर यांना ९ मते मिळाली. दरम्यान, नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकांचीही निवड निश्चित आहे. जनशक्ती पॅनलकडून पॅनेल उभारणीपासून विजयापर्यंत परिश्रम घेतलेले गोपाल अग्रवाल व गौतम नाईक यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीकडून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रा. अ‍ॅड. विजय गुजरे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे.
 
 
 
Umarkhed: Dominance of Janashakti Panel जनशक्ती पॅनलमध्ये काँग्रेस, उबाठा व विदर्भ-मराठवाडा आघाडी यांनी संयुक्तरित्या निवडणूक यश संपादन केले आहे. विदर्भ-मराठवाडा आघाडीच्या तेजश्री जैन नप अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशांनुसार, निकालानंतर २५ दिवसांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक असल्याने ही सभा पार पडली. या पहिल्याच बैठकीत उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्याने राजकीयदृष्ट्या या सभेला विशेष महत्त्व होते. आता पुढील सभेत विषय समित्यांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0