राज्यात मतदारांचा घराणेशाहीला नकार..

16 Jan 2026 14:27:00
मुंबई,
Voters reject dynastic politics. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यभरात निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली. १५ जानेवारीला राज्यातील २९ महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले. आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या कलांनुसार जवळपास २६ महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. या निवडणुकीत अनेक पक्षांनी आपल्या नेते, पदाधिकारी यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मतदारांनी घराणेशाहीला विरोध दर्शविला आणि अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये सदा सरवणकर यांचा पुत्र, नवाब मलिक यांचा भाऊ, सुधाकर बडगुजर यांचा मुलगा आणि डॉन अरूण गवळी यांची मुलगी यांचा समावेश आहे.या निकालांमुळे निवडणुकीत घराणेशाहीवर असलेली सत्ता आणि प्रतिष्ठा धक्क्यात आली आहे. मतदारांनी स्पष्ट संदेश दिला की मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच प्राधान्य द्यावे आणि नेत्यांच्या नातेवाईकांना थेट पाठिंबा मिळणार नाही.
 

bjp maharashtra no 
  • मुंबई प्रभाग १९४ – सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर पराभूत
  • मुंबई प्रभाग १६५ – नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक हरले
  • मुंबई प्रभाग ७३ – रवींद्र वायकरांच्या मुलीचा पराभव
  • मुंबई प्रभाग २०७ – अरूण गवळी यांची मुलगी योगिता गवळी पराभूत
  • नाशिक – सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर भाजपच्या बंडखोर मुकेश शहाणेंसमोर पराभूत
Powered By Sangraha 9.0