गोंदियासह पाच जिल्ह्यांना ‘जल सिंचन प्रकल्पा’चा हातभार !

16 Jan 2026 18:53:57
मुख्यमंत्र्यांची संकल्पना : रोजगार हमी योजनेतून होणार साकार
प्रमोदकुमार नागनाथे
 
गोंदिया, 
ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर व्हावी, जलसंधारण आणि माती संवर्धन व्हावे यासाठी राज्याचे मुख्ययमंत्री देवेंद‘ फडणवीस यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गोंदियासह राज्यातील ५ जिल्ह्यात Water Irrigation Project (High Impact Mega Watershed Project) जल सिंचन प्रकल्प (हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट) राबविण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षे सदर प्रकल्प राबविण्यात येणार असून तसे पत्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत संबंधित जिल्हा प्रशासन व यंंत्रणांना पाठविण्यात आले आहे.
 
 
Sinchan
 
Water Irrigation Project (High Impact Mega Watershed Project) मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशन, भारत रुरल लाइव्हलीहूड फाउंडेशन यांच्यामध्ये तसा सामंजस्य करार झाला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींचे बळकटीकरण, कामांचे नियोजन, संनियंत्रण व अंमलबजावणी, ग्रामपंचायतींना सहयोग करण्यासाठी संबंधित फाउंडेशन द्वारे १० सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन दोन तालुक्यांमध्ये काम करणार आहे. प्रकल्प पाच वर्षापर्यंत राबविण्यात येणार असून प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता राज्यस्तरावर भारत रुरल लाइव्हलीहूड फाउंडेशनचे एसपीएमयुची स्थापना करण्यात आलेली आहे. याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यातील २६ तालुक्यांमध्ये एकूण ८७८ लघु पाणलोट क्षेत्राचे विकास करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून ४.३९ लक्ष हेक्टर जमिनीचे क्षेत्र सिंचित करण्यात येणार आहे. प्रकल्पांतर्गत ८०० ग्रामरोजगार सेवक व ६ हजार आरपीआय व बचतगट सदस्यांना डीपीआर व लाइव्हलीहूड प्लॅनच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीकरीता प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सहा तालुके
पुढील पाच वर्षे राबविण्यात येणार्‍या या जल सिंचन प्रकल्पात जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात सडक अर्जुनी, तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगाव या तालुक्यांचा समावेश आहे.
 
 
हे आहेत उद्दिष्टे...
Water Irrigation Project (High Impact Mega Watershed Project) प्रकल्पाच्या माध्यमातून कमीत कमी एक लाख शेतकर्‍यांचे उत्पन्न सिंचित करणे, जवळपास १.७७ लाख हेक्टर असिंचित जमीन सिंचित करणे, मृदा व जलसंधारणाच्या व्यवस्थापनाद्वारे जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे तसेच पावसाच्या पाण्यावर कमी अवलंबून राहणे, बहुपीक प्रणालीला प्रोत्साहन देणे, मनरेगाच्या निधीचा उपयोग करुन टिकाऊ व उत्पादक संरचनांची निर्मिती करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत.
Powered By Sangraha 9.0