यवतमाळ नगर परिषदेत ‘महिलाराज’

16 Jan 2026 19:29:01
विषय समित्यांवर प्राधान्य : अनेकांची संधी हुकली
यवतमाळ, 
Yavatmal Municipal Council  in 'Mahilaraj ' नगर परिषदेच्या विषय समिती सभापती निवड शुक्रवार, १६ जानेवारी प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. तर उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी यांची पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या सभागृहात दुपारी दोन वाजता सभा बोलावण्यात आली होती. अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे उपस्थित होते. सभेत नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार उपस्थित होते.
 
 
Mahija Raj
 
Yavatmal Municipal Council in 'Mahilaraj ' सभेदरम्यान उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम समिती सभापती निता केळापुरे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती भवरे, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य सभापती लता ठोंबरे, नियोजन व विकास सभापती रिता धावतोडे, महिला व बालकल्याण सभापती शोभा साबळे, तर स्थायी समितीत सदस्य म्हणून रेखा कोठेकर, साधना काळे, विशाल पावडे यांची निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या माजी सभापतींनीसुद्धा पुन्हा एकदा सभापतीपदी वर्णी लागावी म्हणून जोरदार फिल्डींग होती. मात्र, यावेळी त्यांची संधी हुकली असून, त्यांना पुढच्या वेळी संधी देण्याचे आश्वास देण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगर परिषद आवारात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Powered By Sangraha 9.0