अरे देवा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात... दिल्ली थंड म्हणून गाडीतच 'लैंगिक संबंध' ठेण्याचा सल्ला

16 Jan 2026 11:18:28
मुंबई
Honey Singh controversy viral video प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग आपल्या गाण्यांइतकाच वादग्रस्त विधानांमुळेही नेहमीच चर्चेत राहिला आहे. अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे तो पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 

Yo Yo Honey Singh controversy viral video 
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हनी सिंग “दिल्ली वाले” या संकल्पनेत बोलताना काही आक्षेपार्ह आणि धाडसी वक्तव्य करताना ऐकू येतो. हनी सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो असे म्हणताना ऐकू येतो की, “दिल्लीत खूप थंडी आहे, म्हणून गाडीत करा… गाडीत खूप मजा येते. या थंडीत. गाडीत लैंगिक संबंध ठेवा. दिल्लीच्या थंडीत. कंडोX वापरा. या वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकडून जोरदार जयजयकार आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र, व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी संताप व्यक्त करत हनी सिंगवर टीका केली. काहींनी त्याच्या वक्तव्याला अशोभनीय आणि समाजाला चुकीचा संदेश देणारे असल्याचे म्हटले, तर काही चाहत्यांनीही त्याच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले.
 
 
वादग्रस्त विधान सुरूच
 
 
हनी सिंगसाठी Honey Singh controversy viral video ही पहिलीच वेळ नाही की त्याच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. २०१३ मध्ये एका लाईव्ह शोदरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानामुळे तो मोठ्या वादात सापडला होता. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्याच्यावर महिलांवरील हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या, तसेच अनेक सामाजिक संघटनांनी त्याचा तीव्र निषेध केला होता. या वादाचा त्याच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला होता आणि त्याला सार्वजनिकरित्या स्वतःचा बचाव करावा लागला होता.
 
 
यानंतर २०१४ मध्ये  Honey Singh controversy viral video एका मुलाखतीदरम्यान हनी सिंगने दिग्गज गीतकार गुलजार यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांवर टिप्पणी करत ती महिलाविरोधी असल्याचे म्हटले होते. जर स्वतःची गाणी अश्लील म्हणून टीकेला सामोरे जात असतील, तर इतर लोकप्रिय गाण्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे, असे त्याने म्हटले होते. या विधानानेही सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता.सध्याच्या प्रकरणातही सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, काही जण हनी सिंगच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे समर्थन करत आहेत, तर अनेकांनी कलाकार म्हणून त्याच्यावर असलेल्या सामाजिक जबाबदारीची आठवण करून दिली आहे. सततच्या वादांमुळे हनी सिंगची प्रतिमा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, या प्रकरणावर तो कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0