जनार्दन स्वामींच्या जीवनप्रवासाचे रंगमंचावर प्रभावी दर्शन

17 Jan 2026 14:38:38
नागपूर,
Janardan Swami जनार्दन स्वामी मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘एका योगी याची कहाणी’ हे नाटक सादर करण्यात आले. जनार्दन स्वामी यांच्या जीवनावर आधारित या नाटकाचे लेखन सुलभा कुलकर्णी यांनी केले असून दिग्दर्शन रमेश लखमापुरे यांनी केले आहे. प्रमोद देशपांडे यांच्या निर्मितीत हे नाटक यशस्वीरीत्या सादर झाले.
 
nagpur
 
नाटकात स्वामीजींच्या बालपणापासून ते त्यांच्या कार्यापर्यंतचा जीवनप्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला. महिलांचे व बालकांचे योगवर्ग सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले. Janardan Swami सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम साकारल्या. सायंटिफिक सभागृहात सादर झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्रीराम खांडवे यांच्या हस्ते कलाकारांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
सौजन्य: मीनाक्षी देशपांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0