दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालयात च्यवनप्राश निर्मिती कार्यशाळा

17 Jan 2026 14:22:03
नागपूर,
Datta Meghe Ayurveda College दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथे आयुर्वेदातील पारंपरिक व शास्त्रोक्त औषधनिर्मिती प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी शास्त्रोक्त च्यवनप्राश निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हर्षला राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. या कार्यशाळेत आयुर्वेद शास्त्रानुसार च्यवनप्राश तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आली. डॉ. वासवी तोटावार, डॉ. योगी ताजने व डॉ. संतोष सुर्यकांत पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने च्यवनप्राशाची निर्मिती करण्यात आली.
 
Datta Meghe Ayurveda College
 
कार्यशाळेदरम्यान कच्च्या औषधी द्रव्यांची निवड, शोधन प्रक्रिया, पाकसिद्धी, योग्य प्रमाण तसेच गुणवत्तेची काळजी या सर्व बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. Datta Meghe Ayurveda College विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रत्यक्ष अनुभवातून आयुर्वेदिक औषधनिर्मितीचे ज्ञान प्राप्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रीय ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्य प्राप्त होऊन आयुर्वेदातील औषधनिर्मितीची परंपरा जपण्यास व पुढे नेण्यास मोलाची मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0