नकली नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

17 Jan 2026 20:50:07
पुसद, 
counterfeit-notes : बोरी खुर्द येथील एका घरात 500 रुपयांच्या नकली नोटा प्रिंट काढून छापत आहेत, अशी गुप्त माहिती पुसद शहर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी लगेच बोरी खुर्द येथे अचानक धाड टाकली. पोलिसांनी या धाडीत नकली नोटा छापण्याचे सर्व साहित्य जप्त केले. दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार आहे. ही घटना शनिवार, 17 जानेवारीला रोजी संध्याकाळी 5 वाजता बोरी खुर्द येथे घडली.
 
 
 
y17Jan-Nota
 
 
 
प्राप्त माहितीवरून, आरोपी संतोष जगदेवराव सूर्यवंशी (वय 49, कळमनुरी, जि. हिंगोली), गणेश धर्मा गायकवाड (पुसद) हे आरोपी विनोद केरबाजी कुरडे (बोरी) यांच्या घरी प्रिंटरवर 500 रुपयांच्या नकली नोटा छापण्यास सुरुवात केली होती. जवळजवळ 15 नकली नोटा छापण्यात आल्या.
 
 
गुप्त माहितीनुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी छापा टाकत तेथे असलेल्या 500 रुपयांच्या 4 ओरिजनल नोटा व 15 नकली नोटा जप्त केल्या. तसेच प्रिंटर, केमिकल, कोरे कागद, कटर, पॅड इत्यादी साहित्य जप्त करून आरोपी संतोष जगदेव सूर्यवंशी, गणेश धर्मा गायकवाड यांना अटक करण्यात आली, तर विनोद केरबाजी कुरडे हा आरोपी फरार आहे.
 
 
पोहेकॉ सुनील मदने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एपीआय केदार, पोहेकॉ सुनील मदने, पोहेकॉ पंकज पातुरकर, पोहेकॉ शंकर टाळीकोटे, एनपीसी खुशाल चव्हाण, पीसी जुनैद सय्यद व दिनेश सोळंके यांनी प्रत्यक्ष छापा मारून केली आहे.
Powered By Sangraha 9.0