मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची मतमोजणी पूर्ण

17 Jan 2026 09:13:05
नागपूर, 
counting of votes नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असून, मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात भारतीय जनता पार्टीचे १०२, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३४, बहुजन समाज पार्टीचे १, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे १, शिवसेना (शिंदे)चे १, शिवसेना (उबाठा) चे २, एआयएमआयएमचे ६, तर मुस्मिल लीगचे ४, असे एकूण १५१ नगरसेवक निवडून आले.
 

counting 
 
 
राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणुक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे, संतोष थिटे मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, वैष्णवी बी, उपायुक्त निर्भय जैन यांच्या देखरेखीत निवडणूक प्रक्रिया पूर्णत पार पडली. तत्पुर्वी गुरुवारी झालेल्या मतदानात शहरातील ५१.३८ टक्के मतदारांनी आपल्या मताधिकाराचा हक्क बजावला.
मतमोजणी प्रक्रियेत लक्ष्मीनगर झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे, अखिलभारत मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, व कार्यकारी अभियंता रविंद्र बुंधाडे सहा. निवडणूक निर्णय अधिकारीच्या देखरेखीत पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र.१६,३६,३७,३८ या चार प्रभागांचा समावेश होता.
धरमपेठ झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी इंदिरा चौधरी, तहसिलदार संतोष खांडरे, झोनचे सहायक आयुक्त  राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे यांच्या देखरेखीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र.१२,१३,१४,१५ या चार प्रभागांचा समावेश होता.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोनमधील निवडणुक निर्णय अधिकारी प्रदिप शेलार ,श्रीमती रोहिणी पाठराबे, झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी यांच्या देखरेखीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र.२९,३१, ३२,३४ या चार प्रभागांचा समावेश होता.
धंतोली झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रियेश महाजन,कौशल्याराणी पाटील, तहसीलदार, (पुनर्वसन) जि.का. वर्धा, झोनचे सहायक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांच्या देखरेखीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र. १७,३३,३५ या तीन प्रभागांचा समावेश होता.
नेहरूनगर झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कुंभार, सतिश साळवे, विकास रायबोले, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण यांच्या देखरेखीत मतदान मोजणी प्रक्रिया पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र. २६,२७,२८,३० या चार प्रभागांचा समावेश होता.
गांधी महाल झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीराम मुदंडा, महाव्यवस्थापक, (ना.सु.प्र.), वैभव पवार, तहसिलदार, लाखांदूर, जिल्हा भंडारा, झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता गिरीश लिखार यांच्या देखरेखीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र. ८,१८,१९,२२ या चार प्रभागांचा समावेश होता.
सतरंजीपुरा झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी संपत खलाटे, श्रीमती शितल घावटे, तहसिलदार, लाखनी, जिल्हा भंडारा, झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता अश्विनी यलचटवार यांच्या देखरेखीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र. ५,२०,२१ या तीन प्रभागांचा समावेश होता.
लकडगंज झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मलिक विराणी, श्रीमती प्राजक्ता बुरांडे, तहसीलदार, मोहाडी, जिल्हा भंडारा, झोनचे सहायक आयुक्त विजय थूल, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार यांच्या देखरेखीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र. ४,२३,२४,२५ या चार प्रभागांचा समावेश होता.
आशीनगर झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, विनिता लांजेवार, तहसीलदार, (सामान्य), जि.का. वर्धा, उपायुक्त व झोनचे सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता निलेश बोबडे यांच्या देखरेखीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र. २,३,६,७ या चार प्रभागांचा समावेश होता.
तसेच मंगळवारी झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी करिता श्री विवेक साळुंके, गणेश दिघे, उपजिल्हाधिकारी, सध्या तहसिलदार पदावर प्रशिक्षणाकरिता नेमणूक, भंडारा जिल्हा (तहसिल कार्यालय), तुमसर, उपायुक्त व झोनचे सहायक आयुक्त श्री. अशोक गराटे, कार्यकारी अभियंता श्री. नरेश शिंगणजोडे यांच्या देखरेखीत मतदान प्रक्रिया पार पडली. या झोन मध्ये प्रभाग क्र. १, ९, १०,११ या चार प्रभागांचा समावेश होता
Powered By Sangraha 9.0